У нас вы можете посмотреть бесплатно CULTURAL PROGRAM AT SHRI CHHATRAPATI SHIVCHARITRA PARAYAN SAPTAHA или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संत कबीर विद्यालयाच्या मुलींनी छत्रपती शिवरायांच्या काळातील होणारा दररोजच्या अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध शिवरायांनी कसं स्वराज्य घडवलं येथे सदृश्य दर्शन सर्वांना नृत्या मधून दाखवले. अतिशय सुंदर असं नृत्य संत कबीर यांच्या मुलींनी छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह सोहळा कार्यक्रमांमध्ये सादर केले. श्री छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह सोहळा वर्ष नवे. कार्यक्रमाचे मुख्य प्रवक्ता व संयोजक प्राध्यापक चंद्रकांत भराट यांनी गेल्या नऊ वर्षांपासून क्रांती चौक येथे हा कार्यक्रम 13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी यादरम्यान घेत आहेत. गेल्या नऊ वर्षांमध्ये 51 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी क्रांती चौक येथे येऊन शिवचरित्राचे पारायण केले व त्यामधून छत्रपती शिवरायांचे विचार मणी धरले. गेल्या नऊ वर्षांमध्ये प्राध्यापक चंद्रकांत भराट सर यांनी स्वतः छत्रपती शिवरायांवरील विषयक मुद्दे निवडून लहान मुलांकरिता छोटे सोपे पुस्तक स्वतः लिहून पारायनाला येणाऱ्या मुलांना हे वाचायला देतात आत्तापर्यंत सरांनी स्वखर्चातून दहा हजार पेक्षा जास्त पुस्तके विनामूल्य वाटलेली आहेत आणि छत्रपती शिवरायांचे विचार याचा प्रसार केलेला आहे . या नव्या वर्षी शिक्षणाधिकारी लाटकर मॅडम आणि चव्हाण मॅडम यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या आणि यावर्षीचे पुस्तक "छत्रपतींचे स्वराज्य संहिता"हे पुस्तक शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिले. पुस्तक वाचून दादा भुसे यांना या आनंद झाला व त्यांनी लाटकर मॅडम कडे संदेश पाठवला असे उपक्रम अजून राबविण्यात यावे छत्रपती शिवरायांचे विचार छत्रपती शिवरायांच्या आचार आणि छत्रपती शिवरायांचा न्याय देण्याचा व चांगला मावळा घडवण्याचा संदेश सर्वत्र महाराष्ट्रभर भारतभर झाला पाहिजे असे सांगितले आणि छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा दिला व पुढच्या वर्षी स्वतः हजर राहण्याची ग्वाही दिली. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला सर्व धर्मीय विद्यार्थी शिवचरित्राचे पारण करण्यासाठी यावर्षी पण क्रांती चौक येथे आले यामध्ये हिंदू , मुस्लिम, सिख ईसाई असे सर्व विद्यार्थी गण या कार्यक्रमाला दरवर्षीच हजेरी लावतात. कार्यक्रमाची मूळच सर्वत्र एकत्र आणि सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करण्याचे आहे. पुस्तकाच्या कव्हर पेजवर हे दोन महत्त्वाचे वाक्य प्रा.चंद्रकांत भराट यांनी लिहिले आहे पहिला म्हणजे "वाचा शिवचरित्र, वाचेल राष्ट्राचे चारित्र्य" आणि "हिंदू ,मुस्लिम, शीख ईसाई| स्वराज्य के शूर सिपाही|| यावर्ष कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी बहुजन समाज कल्याण मंत्री अतुलजी सावे साहेब, माजी मंत्री अनिल पटेल साहेब,खा. डाक्टर कल्याण काळेसाहेब,माजी आमदार चंद्रकांत खैरे साहेब. खासदार व मंत्री भागवत कराड साहेब ,छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब, आमदार संजय केनेकर महापौर समीर जी राजुरकर, रक्तप्रभाचे संचालक मानसिंग बापू पवार,पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर, छत्रपती संभाजी नगर मनपा आयुक्त जी श्रीकांत सर व जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन किरण पाटील डोणगावकर, मोतीलाल जगताप,नगरसेवक भाऊसाहेब जगताप,नगरसेवक शिवाजी दांडगे,नगरसेवक अनिल मकरीये, नगरसेवक नंदकुमार घोडेले,नगरसेवक विकास जैन नगरसेवक सचिन खैरे, ऋषी खैरे,जिल्हा शिवजयंती अध्यक्ष किशोर शितोळे, प्राचार्य अशोक तेजनकर, उपप्राचार्य चंद्रकांत गायकवाड,मराठवाडा संस्था महामंडळ अध्यक्ष संयोजक वाल्मीक सुराशे, संयोजक एस पी जवळकर, मिर्झा सलीम बेग, मनसुर शेख,इब्राहिम पठाण, प्रदिप दादा सोळंके,संस्थाचालक प्रकाश काळे, अक्षय शिसोदे, किरण जाधव पाटील, माजी शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, माजी शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे, उद्योजक अर्थतज्ञ डी एस काटे,डॉक्टर मच्छिंद्र गोरडे जीएस गायकवाड, प्राध्यापक गणेश गोळेकर शिक्षणाधिकारी इतर मान्यवरांनी 13 फेब्रुवारी 19 फेब्रुवारी दरम्यान हजेरी लावली.