У нас вы можете посмотреть бесплатно डहाणू || ओसरविरा येथे राजकीय भूकंप, शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा लालबावटा पक्षात प्रवेश или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ओसरविरा येथे राजकीय भूकंप; शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा लाल बावटा पक्षात प्रवेश डहाणू, प्रतिनिधी : डहाणू तालुक्यातील ओसरविरा गावात मोठी राजकीय उलथापालथ घडून स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेकडो ग्रामस्थांसह मार्क्सवादी लेनिनवादी विचारसरणीच्या लाल बावटा पक्षात जाहीर प्रवेश केला. ओसरविरा गावातील या सामूहिक पक्षप्रवेशामुळे डहाणू तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी-मजूरांच्या प्रश्नांवर लढा देणाऱ्या लाल बावटा पक्षाच्या धोरणांमुळे प्रभावित होऊन ग्रामस्थांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. पक्षप्रवेशावेळी नेत्यांनी रोजगार, शेती, पाणी व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ठोस लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, या घडामोडीमुळे डहाणू तालुक्यातील सत्ताधारी पक्षांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली असून आगामी ग्रामपंचायत व स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.