У нас вы можете посмотреть бесплатно श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सव ब्रह्मचैतन्य गुहागर ४ डिसेंबर 2025 वर्ष ६ भाग १ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कीर्तन कर्त्या : श्रीमती शिल्पा संजय पटवर्धन शिक्षण : B. Com., M. A. मराठी २०१५, D. Ed. २०१९ , संगीत विशारद ( हार्मोनियम, गायन ), पं. यशवंत देव यांच्या मार्गदर्शनाखाली शब्दप्रधान गायकीची पदविका प्राप्त. कीर्तनालंकार २०१७. कीर्तन शास्त्र मध्ये B.A. कीर्तन मधुकर २०२०. कीर्तन रत्नाकर २०२१. श्रीमद्भागवत २०२२, देवी भागवत २०२३ शिकले आहे. सुशिल्प भजनी मंडळ सुरू केले आहे. अनुभव : Ies च्या ashlane शाळेत संगीत शिक्षिका म्हणून चार वर्षे काम केल्यानंतर आता बालमोहन विद्यामंदिर मध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करत आहे. २०१२ साली संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार. २०१७ साली महाराष्ट्र राज्य संगीत शिक्षक अध्यापक मंडळ तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार. २०२४ मध्ये बालमोहन विद्यामंदिर तर्फे प्रदीर्घ काळ सेवेबद्दल शिक्षक गौरव पुरस्कार. घरगुती शिकवणीचा अनुभव १९९१ पासून. सांगीतिक वाटचाल : दूरदर्शन वरील सारे सा रे गाऊया, ताक धिनाधिन, यासारख्या सांगीतिक कार्यक्रमात सहभाग. स्वरसुमनांजली हा स्वतःचा वाद्यवृंद. अनेक कार्यक्रमांना, स्पर्धांना संवादिनीवादनाची साथ. रोहा, खोपोली, माणगाव, चौल, नागाव या सह मुंबईत अनेक ठिकाणी कीर्तन सेवा केली आहे. एकूण १०० च्या आसपास कीर्तन सेवा झाल्या आहेत. दादर माटुंगा कलचरल सेंटर, दादर भगिनी समाज, सायन भगिनी समाज, सावंतवाडी समाज अशा अनेक ठिकाणी गायन, भजनाच्या स्पर्धांना परीक्षक म्हणून परिक्षण केले आहे. आवड, छंद : संगीत, वाचन, प्रवास, कविता करणे. नुकताच शब्दशिल्प हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. संवादिनी साथ: सागर पटवर्धन फ्री लान्सर म्हणून व्हिडीओ शूटिंग, एडिटिंग, you tube creator. अप्पा वढावकर, मंदार आपटे, अर्चना गोरे, निहिरा जोशी यांच्या बरोबर काम करतो. पेटी चे शास्त्रीय शिक्षण उपान्त्य विशारद, Trinity ची piano ची परीक्षा दिलेली आहे. तबला साथ: प्रशांत नाईकडे गाव – कराड, सांगीतिक शिक्षण - संगीत विशारद पर्यंतचे शिक्षण श्री मयूर जोशी यांच्याकडे झाले. आणि आता संगीत अलंकार चे शिक्षण सुरू आहे. शालेय शिक्षण - B.tech mechanical engineer कथ्थक: सौ विभावरी आशिष नेवरेकर . कथ्थक विशारद, कथ्थक कोविद आहेत. त्या गेली १५-२० वर्षे शास्त्रीय नृत्याचे वर्ग घेत आहेत. विविध शाळा , government तसेच corporate ऑफिसमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन त्या करतात. सध्या गांधर्व व नालंदा महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी त्या परिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नेपाळ येथील DAV शाळेसाठी कथ्थक HOD म्हणून कार्यरत आहेत. तसेच गेल्यावर्षी त्यांनी नेपाळ येते guest performance सादर केला. भारतात तसेच भारताबाहेरही त्या ऑनलाईन पद्धतीने नृत्याचे वर्ग घेत आहेत. Kalasadhana Dance Academy नावाची त्यांची नृत्यसंस्था आहे. कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांना त्यांनी नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे. सचिवालय जिमखानामध्ये त्या कथ्थक प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वर्षी २६ जानेवारी २०२४ रोजी ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी दिल्ली येथे आपल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचे नेतृत्व केले. ४ वर्ष ते ६० वर्ष या वयोगटातील त्यांच्या विद्यार्थिनी आहेत. तसेच त्यांचे Kalasadhana creations या नावाचे YouTube channel तसेच Instagram page आहे. कथ्थक: कल्याणी सुभाषचंद्र मेहेंदळे . त्या सुद्धा विभावरी ताईंकडेचे गेली अनेक वर्षे नृत्याचे धडे घेत आहेत कथ्थक आणि भरतनाट्यम या दोन्ही शैलींचे शिक्षण त्यांनी विभावरी ताईंकडून घेतले आहे, २६ जानेवारी २०२४ रोजी दिल्ली कर्तव्यपथावर त्यांनी त्यांच्या गुरूंसोबत महाराष्ट्राच्या चित्ररथाचे नेतृत्व केले. बालमोहन विद्यामंदिरमध्ये पूर्वप्राथमिक विभागात त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तसेच ५ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांना प्रदीर्घ काळ सेवेबद्दल शिक्षिक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला