У нас вы можете посмотреть бесплатно औद्योगिक संबंध संहिता सुधारणा विधेयक २०२६ लोकसभेत मंजूर | समान कामाला समान वेतन или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
लोकसभेत आज औद्योगिक संबंध संहिता सुधारणा विधेयक २०२६ मंजूर करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी एकाच कामासाठी पुरुष आणि महिला कामगारांचे वेतन वेगळे राहणार नसल्याचे स्पष्ट केले. सध्या लागू असलेल्या श्रम संहितांमधून समान कामासाठी समान वेतनाची हमी दिली जाते, असे त्यांनी नमूद केले. या विधेयकाचे फायदे अधोरेखित करताना त्यांनी वेळेवर वेतन, किमान वेतनाची हमी, तसेच औद्योगिकीकरणाला चालना देणाऱ्या तरतुदींचा उल्लेख केला. विरोधकांचा कामगार संहितेला असलेला विरोध केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोपही मांडवीया यांनी केला. या विधेयकाद्वारे औद्योगिक संबंध संहिता २०२० मध्ये सुधारणा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कामगारांशी संबंधित तीन कायद्यांच्या अंमलबजावणीत भविष्यात अनावश्यक गुंतागुंत टाळणे हा या सुधारणेमागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले. हे विधेयक कामगार संघटना, औद्योगिक युनिटमधील रोजगार आणि औद्योगिक वादांशी संबंधित आहे. #LokSabha #LabourCode #IndustrialRelations #EqualPay #MansukhMandaviya #ParliamentNews #LabourReforms #IndiaNews