У нас вы можете посмотреть бесплатно 🌎वर्षातून एकदा तरी सातबारा तपासा-जिल्हा न्यायाधीश बी.एम.पाटील;अकोटला श्रद्धासागरवर कायदेविषयक शिबिर или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
न्यायालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील खटल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.अकोट-अकोला,तेल्हारा भागात शेतकरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे.त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी निदान वर्षातून एकदा तरी त्यांचा सातबारा तपासून घ्यावा.कारण त्यांच्या नावे असलेला सातबारा नातवाच्या नावावर कधी झाला हे अनेकदा आजोबांनाच माहिती नसते.त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कागदपत्र तपासल्याशिवाय सह्या किंवा अंगठा देऊ नये,असे प्रबोधन जिल्हा न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी केले. श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे मंगळवार ता.१७ फेब्रुवारी २०२६ ला,सकाळी संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवात तालुका विधि सेवा समितीतर्फे आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात प्रमुख वक्ता म्हणून न्यायाधीश बी.एम.पाटील बोलत होते. मुंबई येथील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा समिती यांच्या निर्देशांन्वये या शिबिराचे आयोजन तालुका विधी सेवा समितीमार्फत करण्यात आले होते. याप्रसंगी ज्ञानपीठावर सह दिवाणी न्यायाधीश(वरिष्ठ स्तर)महेश काळे,सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर)ए.एच. शेख व ए.ए.माळी,संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महल्ले,विश्वस्त नंदकिशोर हिंगणकर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश मोहिते,डॉक्टर पुष्पाताई वालसिंगे,सामाजिक कार्यकर्ते विजय जितकर,उपाध्यक्ष बाबाराव बिहाडे व महादेवराव ठाकरे,अध्यक्ष पुरुषोत्तम लाजूरकर,सहसचिव अवी गावंडे व मोहनराव पू.जायले, विश्वस्त दिलीपराव हरणे,ऍड.शिरीष ढवळे,मध्यस्थीचे सचिव सुरेश दादा कराळे,कोषाध्यक्ष जयकृष्ण वाकोडे, सदस्य मधुकरराव पुंडकर,प्रा.साहेबराव मंगळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवर पाहुण्यांचे श्री श्रद्धासागर मध्ये आगमन झाल्यावर संस्थेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.यानंतर पाहुण्यांनी मंदिरात जाऊन संत वासुदेव महाराज यांच्या मूर्तीचे दर्शन,हारर्पण व पूजन केले.त्यानंतर ज्ञानपीठारील पुजास्थळावर जाऊन महाराजांच्या मुर्तीसमोर मान्यवर नतमस्तक झाले. यानंतर स्थानापन्न झालेल्या न्यायाधीशांचा संस्थेतर्फे शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.इतर मान्यवर पाहुण्यांचेही गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर संस्थेचे विश्वस्त नंदकिशोर हिंगणकर यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी जयंती महोत्सव अंतर्गत आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. यानंतर मान्यवर न्यायाधीशांनी शिबिराला मार्गदर्शन केले.न्या.ए.ए.माळी यांनी नागरिकांचे मूलभूत अधिकार व माहितीच्या अधिकारांविषयी माहिती दिली.माणूस जेव्हा कर्तव्य विसरतो तेव्हा कायद्याला पुढाकार घेऊन त्याला वठणीवर आणावे लागते,असे ते म्हणाले.संविधान हे कायद्याचे पुस्तक नसून तो भारतीय समाजाचा आत्मा आहे.नागरिकांना कर्तव्य तर असतातच पण त्याला मूलभूत अधिकारही असतात. त्या अधिकारांचा समावेश संविधानाच्या भाग तीन मध्ये अनुच्छेद १४ ते ३२ मध्ये करण्यात आला आहे,अशी व इतर आवश्यक माहिती न्यायाधीश श्री.माळी यांनी दिली. न्या.ए.एच.शेख यांनी यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध घालवण्यासाठी नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.माहिती तंत्रज्ञानाचा जसा फायदा होत आहे;तसा तोटाही सहन करावा लागत आहे.मोबाईल हा प्रत्येक व्यक्तीचा स्मार्ट मित्र जरी असला तो धोकादायक ठरू शकतो.या मोबाईलमुळे आपल्या सोबत फसवणुकीचे अनेक प्रकार घडू शकतात व कळत न कळत आपले नुकसान होऊ शकते.आपल्या खात्यामधली रक्कम मोबाईलच्या माध्यमातून चोरी करण्याचे ऑनलाईन तंत्र चोरट्यांनी अवगत केले आहे.त्यामुळे मोबाईलला आलेली लिंक उघडण्यापूर्वी तिची काळजीपूर्वक खात्री करा.संशयास्पद लिंक उघडूच नका.अन्यथा आपला मोबाईल हॅक होण्याची शक्यता असते,असे न्या.शेख म्हणाले. पोलीस उपनिरीक्षक अविनाश मोहिते यांनी वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली.वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे होणारे अपघात व नंतर अपघात ग्रस्त कुटुंबाची होणारी वाताहत,ही आजच्या काळातील फार मोठी समस्या बनत चालली आहे.ज्येष्ठ नागरिक सकाळी,प्रभात फेरीला नियमित जात असतात.ज्या ठिकाणी फुटपाथ नाही;त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी उजव्या बाजूने चालावे,ज्यामुळे समोरून येणारे वाहन या नागरिकांना दिसेल.ज्यामुळे आपल्याला रस्त्यापासून सुरक्षित अंतर ठेवून अपघात टाळता येईल,असे श्री मोहिते म्हणाले. डॉ.पुष्पाताई वालसिंगे त्यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. ज्याप्रमाणे कायदे,वाहतुकीचे नियम महत्त्वाचे आहेत;तेवढेच महत्त्वाचं माणसाचं आरोग्य देखील आहे,असे त्या म्हणाल्या.अध्यात्मिक समाज हा नियमाने वागतो,असे देखील त्या म्हणाल्या. जिल्हा न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी प्रमुख भाषणात सक्षम समाजासाठी 'मेळावे'आवश्यक असल्याचे सांगितले.ज्ञानेश्वरी मध्ये खूप ताकद आहे.ज्ञानेश्वरीचे अनुसरण करणारा वारकरी सक्षमपणे जीवन जगतो.(चौकट)"ज्या ठिकाणी रस्ता सापडत नाही; त्या ठिकाणी गुगल मॅप मदत करतो;त्याचप्रमाणे जिथे सर्व मार्ग बंद होतात;तिथे विठ्ठल भक्ती योग्य मार्ग दाखवते,असे मौलिक मार्गदर्शन न्यायाधीश पाटील यांनी केले." या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर हिंगणकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन समाजसेवक विजय जितकर यांनी केले.या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक,महिला-पुरुष वारकरी व भाविकांसह, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, तालुका विधी सेवा समितीचे सर्व सदस्य आदींची मोठी उपस्थिती होती.