У нас вы можете посмотреть бесплатно भारत-सेशेल्समध्ये ७ करार | सेशेल्ससाठी १७५ दशलक्ष डॉलर्सचे पॅकेज; पंतप्रधान मोदींची घोषणा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस येथे भारत दौऱ्यावर आलेले सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत प्रादेशिक तसेच परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्ससाठी १७५ दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजमधून सामाजिक गृहनिर्माण, ई-परिवहन, व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि सागरी सुरक्षेला पाठबळ दिलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत आणि सेशेल्स केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे, तर इतिहास, विश्वास आणि भविष्यासाठीच्या सामायिक दृष्टिकोनामुळे जोडलेले आहेत. एक सागरी शेजारी देश आणि विश्वासू भागीदार म्हणून सेशेल्सला भारताच्या व्हिजन महासागर धोरणात विशेष स्थान आहे. नील अर्थव्यवस्था (Blue Economy) हे दोन्ही देशांसाठी सहकार्याचं नैसर्गिक क्षेत्र असून सागरी संशोधन, क्षमता बांधणी आणि डेटा सामायिकरण यांसारख्या क्षेत्रांत भारत आपलं कौशल्य सेशेल्ससोबत शेअर करेल, असंही त्यांनी सांगितलं. या भेटीत भारत आणि सेशेल्सदरम्यान आरोग्य, हवामानशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान, डिजिटल परिवर्तन आणि सुशासन यासह विविध क्षेत्रांमध्ये ७ सामंजस्य करारांवर (MoUs) स्वाक्षऱ्या झाल्या. सेशेल्समधील नागरी सेवकांना भारतात प्रशिक्षण देण्यासाठी झालेल्या कराराचंही पंतप्रधानांनी स्वागत केलं. दरम्यान, सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी सांगितलं की येत्या जूनमध्ये सेशेल्सच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त भारत–सेशेल्स राजनैतिक संबंधांचा सुवर्णमहोत्सव साजरा केला जाणार असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्माननीय पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. हिंद महासागरातील देश म्हणून सागरी सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्य हे दोन्ही देशांच्या संबंधांसाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. #IndiaSeychelles #PMModi #PatrickHerminie #HyderabadHouse #JointPressConference #ForeignPolicy #BlueEconomy #MaritimeSecurity #DiplomaticRelations