У нас вы можете посмотреть бесплатно Science Exhibition organised by Sarthak Welfare Foundation collaboration with Opus Rural Foundation или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#वैज्ञानिक #वैज्ञानिकद्रुष्टिकोन #scienceindailylife "The good thing about science is that it’s true whether or not you believe in it"! विज्ञान हे केवळ मुलांच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासाचा विषय नाही तर दैनंदिन जिवनातला महत्वाचा घटक आहे! सकाळी उठल्यापासून ते रात्री पर्यंत आपण अनेक वैज्ञानिक शोधांबरोबर आणि चमत्कारां बरोबर जगत आहोत. विज्ञान नुसते आपले जिवन सुसह्य करत नाही तर आपल्या विचारांचे क्षितीज रुंदावायला मदत करते, विचारांची व्याप्ती वाढवते! ह्या करताच विज्ञान समजून घेणे आणि आपले कुतूहल व चौकस अभ्यासू व्रुत्ती कायम जाग्रुत ठेवणं अतिशय महत्त्वाचे! आज आपल्या मुलांमधे गुणवत्तेची कमी नाही! कमतरता असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन व सखोल विचार आणि लाँजिकल विज्ञाननिष्ठ विचारांची! या करताच हे विज्ञान प्रदर्शन! मुलांना सर्वागीण शिक्षण मिळायलाच हवे या करता सार्थक गेले अनेक वर्षे महाराष्ट्रातील खेडोपाड्यातील शाळांमधे कौशल्य विकास, जिवन कौशल्य, अभ्यास कौशल्य व करिअर मार्गदर्शन करत असते. गेली पाच वर्षे श्रीगोंदा तालुक्यातील 25 शाळांबरोबर प्रोजेक्ट क्षितीज अंतर्गत आमची टीम काम करत आहे. या ग्रामीण भागातील 125 अतिशय गरीब व , होतकरु मुलामुलींचे शैक्षणिक पालकत्व देखील सार्थक ने घेतले आहे आणि त्यांना संपूर्ण आर्थिक मदत व कौशल्य विकास, मेंटाँरींग सार्थक तर्फे करण्यात येते. सायन्स एक्झिबिशन चे हे तीसरे वर्ष!! या वर्षी तर 23 शाळांमधून 101 विज्ञान प्रोजेक्ट प्रदर्शनात आणले गेले. मुलांनी अप्रतिम प्रोजेक्ट प्रेझेंट केले. प्रचंड मेहनत घेतलेली समजत होती. अगदी बिबट्या पासून वाचवण्याचा अलार्म, एअर डीफेन्स सिस्टीम, एअर कन्व्हर्टर, सेंद्रिय शेती, सोलर एनर्जी, स्मार्ट कचरा व्यवस्थापन.. अशा अनेक दैनंदिन समस्यांवरती देखील प्रयैग होते. काहींनी मेकॅनिकल ज्यूस मेकर केला होता तर काहींनी स्मोक डीटेक्टर, मदतनीस रोबोट अशा नानाविध प्रयोगांनी आणि उत्साही मुलामुलींनी धवळगाव चे विज्ञान प्रदर्शन ओसंडून गेले होते. आजूबाजूच्या शाळेंमधील पाचशेहून जास्त विद्यार्थी हे प्रयोग बघायला आले होते. अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला Astronomy मधील तज्ञ व जेष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकर सरांचे चेले प्रोफेसर विशाल कुंभारे सर लाभले होते. आणि जजेस देखील अतिशय अनुभवी व जेष्ठ ज्यांनी वर्षानुवर्षे सायन्स आणि टेक्नोलॉजी मधे काम केलेले शेखर जोशी, सुनील मोरे, श्री. तगरे, म्रुणाल, प्रदीप नामजोशी, मेघाली, त्यांनी सर्व मुलांचे प्रोजेक्ट तर बघितलेच पण त्यांना मार्गदर्शन देखील केले. विजेत्या शाळांना दरवर्षीप्रमाणे 15000 रोख बक्षिस रक्कम व चषक, प्रशस्तीपत्र असे दिले जाते याही वेळी श्रीगोंदा तालुक्यातील 6 शाळांनी वेगवेगळी पारितोषिके पटकावून बाजी मारली! मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी सार्थक चे हे प्रयत्न अव्याहत, सातत्याने सुरु असतात! श्रीगोंदा तालुक्यातील उपक्रमांसारखेच उपक्रम आम्ही आता पालघर जिल्हामधे देखील राबवत आहोत! सार्थक चे कार्यक्षेत्र रुंदावले आहे व त्यात शेकडो शाळा सहभागी होत आहेत!