У нас вы можете посмотреть бесплатно त्रिंगलवाडी किल्ला /tringalwadi fort или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या किल्यावर नाशिक जिल्ह्यांतील इगतपुरी तालुक्यातील घोटी या गावापासून जाता येते. इगतपुरीपासुन हा किल्ला सात कि.मी. अंतरावर आहे. इगतपुरी हे राष्ट्रीय महामार्ग ३ वर असलेले गाव आहे आणि ते मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांमध्ये एक आहे त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेण्यावरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १० व्या शतकात झाली असावी. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ज्ञात नाही. मात्र १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे त्रिंगलवाडी गावातून गडावर जाताना पायथ्याशी पांडवलेणी नावाची गुहा आहे. या लेणी ३ भागात आहेत. ओसरी, आत विहार आणि विहारात कोरलेले कोनाडे, प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम आढळते. विहाराच्या आत असलेल्या कोनाड्यात गौतमबुद्धाची ध्यानस्थ मुर्ती आहे. त्या मूर्तीच्या खाली एक शिलालेख आहे. विहाराच्या ४ खांबापैकी ३ खांबाची पडझड झाली आहे. येथून वर किल्ल्यावर जात असताना वाटेतच पायऱ्यांच्या आधी गुहा लागते. पायऱ्यांनी गडावर पोहचल्यावर समोरच पडक्या वाड्याचे अवशेष लागतात. वाड्यांचे अवशेष पाहून परत पायऱ्याकडे वळायचे. पायऱ्यांपासून उजवीकडे वळल्यावर अनेक सुकलेली पाण्याची टाकी आढळतात. ५-१० मिनिटे पुढे गेल्यावर डावीकडे असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी एक मोठी गुहा आहे. या गुहेत २०-२५ जणांना राहता येते. येथून पुढे चालत गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे भुयारी टाके लागते. टाक्याच्या खांबांवर सुंदर नक्षीकाम आढळते. या टाक्यांपासून पुढे गेल्यावर शंकराचे मंदिर लागते. या मंदिरासमोर कड्यावरून दक्षिणेस तळेगड, पूर्वेला कळसूबाई, उत्तरेला त्र्यंबकरांग, हरिहर, असा परिसर दिसतो. आल्या मार्गाने पायऱ्यांपाशी यावे. पायऱ्यांच्या समोरच वाड्याचे अवशेष आहे. ते मागे टाकून सरळ पुढे वाटेने खाली उतरावे आणि उजवीकडे वळावे. ही वाट गडाच्या गुप्त दरवाजापाशी घेऊन जाते. पायऱ्यांनी खाली उतरल्यावर आपण अखंड कातळात कोरलेल्या दरवाजापाशी पोहचतो. दरवाजाच्या उजवीकडे ६-७ फूट उंच हनुमानाची मूर्ती कोरली आहे. समोरच कातळात कोरलेल्या पायऱ्या किल्ल्याच्या मधल्या पठारावर घेऊन फिरण्यास साधारण १ तास पुरतो.