У нас вы можете посмотреть бесплатно मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट चा सन्मान व पुरस्कार सोहळा 2026 संपन्न или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या वतीने वृद्धाना फळ व ब्लॅंकेट वाटप तसेच पदाधिकारी यांना विविध पुरस्काराने सन्मानित दि. 26 जानेवारी रोजी मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या अंतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते मुख्य कार्यालय मेहकर येथे ध्वजारोहण करण्यात आले. वृद्धाश्रम ला भेट व गोरगरीब, वृद्धाश्रमातील,वयोवृद्धाना ब्लॅंकेट आणि फळे वितरण याच बरोबर मानव सुरक्षा च्या सर्व उपस्थित पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा व राज्य भूषण पुरस्कार मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट कडून बहाल करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात सर्व उपस्थित संस्थापक व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भारतमाता,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,पंडित जवाहरलाल नेहरू, स्वामी विवेकानंद,आझाद सुभाष चंद्रबोस, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्राबाई फुले, अण्णाभाऊ साठे, राष्ट्रपिता महात्मा गांधी, श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे तर प्रमुख मान्यवर म्हणून संस्थापक सचिव अरुण पांडव, संस्थापक कोषाध्यक्ष मा. संगीताताई साबणकर,संस्थापक सहसचिव गोविंद अग्रवाल, म. राज्य सल्लागार तथा प्रमुख पाहुणे महेश पवार, म. अध्यक्ष रामेश्वर कापडे, म. महिला अध्यक्षा वंदनाताई म्हैस, म. उपाध्यक्षा राणीताई पवार, म. कोषाध्यक्ष चक्रपाणी चाचर, म. मीडिया प्रमुख समाधान पदमने, म. संघटक आरिफ खान, विदर्भ उपाध्यक्ष गजानन निळे,सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट चे सामाजिक कार्य व उद्दिष्टे काय आहे यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिखली तालुका अध्यक्ष गोपाल सोनटक्के यांनी केले. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नेहसंमेलन सोहळा अंजनी येथील हॉटेल परिवार येथे मोठया उत्साहात व आनंदात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अंतर्गत २०२५ या वर्षात निःस्वार्थ हिताचे सेवाभावी मानव सेवा व सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणाऱ्या पदाधिकारी यांचे सन्मान सत्कार घेऊन राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्काराणे गौरविण्यात आले, पुरस्कार सोहळा अगदी आनंदिमय अनुकूल वातावरण मध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र निरीक्षक फिरदोस खान,विदर्भ अध्यक्ष सुनील गंगाखेडे, विदर्भ कार्याध्यक्ष किशोर भूतकर, विदर्भ सहसचिव दत्तात्रय वाघमारे,रोशनी कानोडजे,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण लांडे,संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पाटील, बुलढाणा उपाध्यक्ष डॉ अशोक पऱ्हाड,जळगाव जिल्हा अध्यक्ष विकास पाटील, चिखली तालुका सचिव राजेंद्र अवचार, मेहकर तालुका उपाध्यक्ष पंकज मिश्रा,सर्व उपस्थित पदाधिकारी व नवनियुक्ती पदाधिकारी यांचे आय कार्ड व नियुक्ती पत्र व त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र वरिष्ठ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मधुन विविध जिल्ह्यातून तसेच तालुका शहर मधून पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली. तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते मेहकर येथील वृद्धाश्रमला भेट देऊन तेथील वृद्ध मानवाला ब्लॅंकेट व फळे वितरण करण्यात आहे. या कार्यक्रमाला मा. अजयजी उमाळकर यांना मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट च्या सर्व उपस्थित वरिष्ठ मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. मा. अजय उमाळकर यांनी या निःस्वार्थ सेवा भावी उपक्रमाची घेऊन सेवेच्या कार्याबद्दल आर्थिक योगदान व सहकार्य म्हणून रुपये ११००० (अकरा हजार रुपये ) दिले आहे. मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट च्या वतीने संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे यांचे कडून सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. ही आपली साथ आणि आपले सहकार्य आजीवन राहो आणि आपल्या सर्वांच्या हातून निःस्वार्थ पणे सामाजिक कार्य घडो आणि मानव सेवा घडो हिच सर्व पदाधिकारी यांना सदिच्छा दिल्या. हा उत्कृष्ट कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाराष्ट्र मीडिया प्रमुख समाधान पदमने व इतर पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.