У нас вы можете посмотреть бесплатно वेंगुर्ला | तळ कोकणातील अंदमान-निकोबारसारखी Hidden Beaches 🏖️ | 720 Kokan Coastal Ride | Ep-2 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वेंगुर्ला हे शहर समुद्रकिनारी वसलेले ऐतिहासिक शहर असून त्यास संपन्न परंपरा लाभली आहे. वेंगुर्ला शहराची मुख्य ओळख एक व्यापारी बंदर म्हणून होती.परंतु आता केवळ एक मासेमारी बंदर अशीच त्याची ओळख उरली आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. महाराष्ट्रातील तुलनेने कमी प्रदूषित समुद्र किनाऱ्यांमध्ये याची गणना होते. Vengurla: अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वेंगुर्ला शहराची नवीन ओळख ही वेगाने विकसित होणारे पर्यटनस्थळ म्हणूनच करून द्यायला हवी.[३] १८५६ पासून नगरपालिका आणि १८७१पासून नगर वचनालय असलेल्या वेंगुर्ला शहराची शैक्षणिक परंपरा उच्च नसली तरच नवल. आजच्या वेंगुर्ल्यात वेंगुर्ला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, बॅ.खर्डेकर कॉलेज, पाटकर हायस्कूल, रा.सी.रेगे जुनियर कॉलेज आणि वेंगुर्ला हायस्कूल या संस्था शैक्षणिक कार्य पाडतात. प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू सुनील गावस्कर यांचे हे गाव. या गावाची ओढ शरद पवार यांसारख्या अनेक मान्यवरांना असते. कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्मही वेंगुर्ल्याचा.[५] एकेकाळचे प्रमु़ख व्यापारी बंदर असल्याने वेंगुर्ल्यात देवस्थानांना नेहमीच संपंन्नता लाभली आहे त्यामुळेच वेंगुर्ल्यात संपूर्ण वर्षभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. विविध देवस्थानांच्या वार्षिक जत्रा आणि त्यानिमित्त होणारे दशावतारी नाट्यप्रयोग हे अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात. शिरोडा : कोकणातील एक सुंदर आणि शांत ठिकाण शिरोडा बीच, महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थित असलेले एक सुरेख समुद्रकिनारा आहे. हे ठिकाण निसर्गाच्या विविधतेत हरवून जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी आदर्श आहे.शिरोडाचा समुद्रकिनारा आपल्या शांततेसाठी, स्वच्छतेसाठी आणि सुंदर वातावरणासाठी ओळखला जातो. इथे आल्यावर निसर्गाच्या सान्निध्यात शांतता आणि शुद्धता अनुभवता येते. या बीचवरील ताज्या समुद्र पाऱ्याचा आनंद घेत पर्यटक थोडेच वेळात शांततेचा अनुभव घेतात. सागरेश्वर : कोकणातील एक अप्रतिम व शांत समुद्रकिनारा सागरेश्वर बीच, महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात वसलेला एक अत्यंत सुंदर आणि शांतिकारक समुद्रकिनारा आहे. येथील समुद्राच्या लाटा, स्वच्छ वाळू, आणि शांत वातावरण पर्यटकांना निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आदर्श ठिकाण आहे. सागरेश्वर बीच पर्यटकांना निसर्ग, जलक्रीडा, कोकणी संस्कृती आणि धार्मिक शांतीचा अनुभव एकत्रितपणे देतो. श्री देव वेतोबा मंदिर वेंगुर्ल्यापासुन साधारण १५ कि.मी. अंतरावर रेडीकडे जाताना आरवली हे गाव लागते. विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात "हरवल्ली" नावाने अस्तित्वात असलेल्या गावाचे नाव कालौघात बदलून "आरवली" झाले. "हर" म्हणजे "शिव" आणि "वल्ली" म्हणजे "वस्ती". हरवल्ली म्हणजे जेथे शिवाची वस्ती आहे असा गाव. आरवलीचे श्री देव वेतोबा मंदिर मूलतः वेताळाचे आहे. "बा" हा आदरार्थी शब्द जोडला गेल्याने "वेताळाचे" वेतोबा झाले असावे. "वेताने वेळेवर मन ताळ्यावर आणणारी शक्ती म्हणजे वेताळ!" दक्षिण कोकणात वेताळ उर्फ वेतोबाची सुमारे १४३ मंदिरे आहेत. कोंडुरा बीच सिंधुदुर्गमध्ये जे अतिसुंदर समुद्रकिनारे आहेत त्यातलाच एक समुद्र किनारा म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील कोंडुरा गावचा कोंडुरा बीच. पांढरीशुभ्र वाळू, गुळगुळीत काळे मोठे खडक हे तुम्हाला या कोंडुराच्या समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळेल. स्वच्छ किनाऱ्याला उंच माडाची साथ संगत आणि शांत परिसरातील सुरेख मंदिर बाजूला शांत वाहणारा ओहळ हे डोळे सुखावणारं निसर्गचित्र पहायचं असेल तर हा कोंडुरा बीच पहायला हवा . प्रसिद्ध खानोलकरांच्या (आरती प्रभू) 'कोंडुरा ' या गाजलेल्या कादंबरीवर श्याम बेनेगल यांनी १९७८ मध्ये हिंदी चित्रपट बनवला आहे . तेंव्हा पासून हे कोंडुरा हे नाव सर्वत्र लोकप्रिय झालं . पावसाची पूर्व कल्पना देणारी गाज ऐकू येणारी गुहा , माडाचं बन , सुरंगीच्या फुलांचे सडे आणि सूर्यास्ताचा नेत्रदीपक नजारा अशी अनेक वैशिष्ट्ये दाखवणारा हा कोंडुरा बीच .. #kokan #malvan #sea #hidden #unexplored #redibeach #konduraBeach #vengurla #sindhudurg #alibaug #palghar #mumbai