Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Gorakhgad Fort Trek Information | Gorakhshnath | भीमाशंकर पर्वत | Near Mumbai Treking | VLOG 🛕 в хорошем качестве

Gorakhgad Fort Trek Information | Gorakhshnath | भीमाशंकर पर्वत | Near Mumbai Treking | VLOG 🛕 2 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Gorakhgad Fort Trek Information | Gorakhshnath | भीमाशंकर पर्वत | Near Mumbai Treking | VLOG 🛕

Gorakhgad Fort Trek Information | Gorakhnath | भीमाशंकर पर्वत | Near Mumbai Treking | VLOG 🛕#gorakhgad #gorakhnath #bhimashankar #trekking #killa Your Queries : Gorakhgad Gorakhgad Fort Trekking Bhimashankar Follow Me On :   / 1cumrrxhps   https://www.instagram.com/ar._.kindre... गोरखगडची माहिती: गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहेत. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण, म्हणूनच याचे नाव ‘गोरखगड’असे पडले. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट भिमाशंकर अभयारण्यामुळे. गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या लढाई झाल्याचा उल्लेख नाही. या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशवर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जातांना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी, निवार्‍याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे. Gorakhgad Gorakhgadपहाण्याची ठिकाणे :गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या प्रवेशव्दारातून वर चढून गेल्यावर वर तीन पाण्याची टाकं लागतात. समोरची वाट पुन्हा थोडयाश्या चढणीवर घेऊन जाते. पुढे पायर्‍यांच्या मदतीने थोडे खाली उतरल्यावर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या अतिविशाल गुहेसमोर येऊन पोहचतो. समोरच प्रांगणाखाली भयाण दरीत झुकलेले दोन चाफ्याचे डेरेदार वृक्ष आणि समोरच असणारा ‘मच्छिंद्रगड’ निसर्गाच्या भव्य अदाकारीचे असीम दर्शन घडवतो. गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत. गोरखगडाच्या पठारावर एकूण चौदा पाण्याची टाके आहेत. पण त्यापैकी गुहे जवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गोरखगडाचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्याशिवाय पूर्ण होतच नाही. गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणार्‍या वाटेने पुढे जावे. थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात ५० पायर्‍या खोदलेल्या आहेत. ५० पायर्‍यांच्या या मार्गावरून जरा जपूनच चढावे लागते. गडाचा माथा फारच लहान आहे. वर एक महादेवाचे मंदिर आहे. आणि समोरच एक नंदी आहे. माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिध्दगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघाट असा सर्व रमणीय परिसर न्याहाळता येतो. पोहोचण्याच्या वाटा :१ कल्याण मार्गे :- गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याण मार्गे मुरबाडला, तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. मुरबाडहून - म्हसा - देहरी फाटया मार्गे धसई गावात यावे. येथून देहरी पर्यंत खाजगी जीप अथवा एस.टी ची सेवा उपलब्ध आहे. देहरी गावातून समोरच दोन सुळके दृष्टिक्षेपात येतात. लहान सुळका मच्छिंद्रगडाचा तर मोठा सुळका गोरखगडाचा आहे. गावातील विठ्ठलाच्या मंदिरात मुक्काम करता येतो. मंदिराच्या मागच्या बाजूने जंगलात जाणारी पायवाट एक ते दीड तासात गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या दरवाज्यापाशी घेऊन जाते. या वाटेने गड गाठण्यास दोन तास पुरतात. २ मुरबाड मिल्हे मार्गे :- मुरबाड - मिल्हे मार्गाने देहरी गावी यावे. या गावातून अतिशय सोप्या वाटेने गडावर जाता येते. ३ सिध्दगड ते गोरखगड गोरखगडावर येण्यासाठी सिध्दगडावरूनही एक वाट आहे अनेक ट्रेकर्स सिध्दगड ते गोरखगड असा ट्रेक करतांना या वाटेचा उपयोग करतात. या वाटेवर एक घनदाट जंगल लागते. सिध्दगडावर जाण्यासाठी मुरबाड नारिवली मार्गाने यावे. नारिवली हे पायथ्याचे गाव आहे. सिध्दगडावर एक रात्र मुक्काम करून पहाटेच सिध्दगड उतरावा वाटेत असलेल्या ओढ्याबरोबर एक वाट जंगलात शिरते. या वाटेने थोडे उजवीकडे गेल्यावर आपण धबधब्याच्या वाटेला जाऊन मिळतो. या वाटेने वर आल्यावर आपण एका छोटयाश्या पठारावर येऊन पोहचतो. पठारावर महादेवाचं छोटे मंदिर आहे आणि दोन समाध्या देखील आहेत. येथून पुढे गेल्यावर लागणारी वाट ही उभ्या कातळातील असल्याने प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. आपण कातळात खोदलेल्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. या मार्गाने गड गाठण्यास तीन तास पुरतात. ४. खोपिवली मार्गे :- मुरबाडहून - म्हसा मार्गे देहरी गावाकडे जाताना, देहरीच्या अलिकडे २ कि.मी. अंतरावर खोपिवली गाव आहे. या गावातून मळलेली पायवाट गोरखगडावर जाते. या पायवाटेवर एक आश्रम आहे. ही वाट इतर वाटांपेक्षा सोपी आहे. या मार्गाने गड गाठण्यास २ तास पुरतात. राहाण्याची सोय :गडावर असलेल्या एका गुहेत २०- २५ जणांना आरामात राहता येते. जेवणाची सोय :गडावर जेवणाची सोय नाही. जेवणाची सोय आपण स्वत:च करावी. पाण्याची सोय :गडावर बारमाही पाण्याची टाके आहेत. जाण्यासाठी लागणारा वेळ :देहरी मार्गे २ तास लागतात. खोपिवली मार्गे २ तास लागतात.सूचना :किल्ल्याच्या सुळक्यावरील कातळात खोदलेल्या पायर्‍या चढता - उतरताना अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. गिर्यारोहणातील अनुभव असल्याशिवाय सुळका चढण्याचे साहस करु नये. Thanks For Watching my Video Akshay Rajendra Kindre

Comments