У нас вы можете посмотреть бесплатно अस्सल आगरी मसला | Traditional Aagri Masala by Tanuja или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार, महाराष्ट्रात अनेक प्रकारचे मसाले बनवले जातात जसे की मालवणी,कोल्हापुरी,मराठवाडा,विदर्भाचा काळा मसाला,तसेच आगरी. आगरी मसाल्यासाठी खालील प्रकारे साहित्य आणि कृती आहे. ■ साहित्य:-(१.५किलो मसाल्यासाठी) मिरच्या- (१)लवंगी मिरची- ५००ग्रॅम (२)ब्याडगी मिरची २५० ग्रॅम (३)काश्मिरी मिरची १२५ ग्रॅम (४)पांडि मिरची- १२५ ग्रॅम (👉👉👉कमी तिखट आणि गडद रंग हवा असेल तर ब्याडगी ५०० ग्रॅम लवंगी २५० ग्रॅम घ्यावी बाकी मिरच्या व मसाले प्रमाण असेच ठेवावे👈👈👈) गरम मसाला- (४)धने-१०० ग्रॅम (५)जिरे- ५० ग्रॅम (६) काळीमिरी- ५० ग्रॅम (७) वेलची - १५ ग्रॅम (८) लवंग - १५ ग्रॅम (९) चक्रीफुल - १० ग्रॅम (१०) मसाला वेलची १५ ग्रॅम (११) दालचिनी - १० ग्रॅम (१२) पांढरी मिरी -१० ग्रॅम (१३) जवित्री १० ग्रॅम (१४)तमाल पत्र - १० ग्रॅम (१५)बडीशोप -५० ग्रॅम (१६) मेथी दाणे १० ग्रॅम (१७)शहाजीरे - १५ ग्रॅम (१८)दगडफुल- १० ग्रॅम (१९)ओवा - १० ग्रॅम (२०)सुंठ- २० ग्रॅम (२१)खसखस - ३० ग्रॅम (२२)पांढरे तीळ - १० ग्रॅम (२३)तिरफळ - १० ग्रॅम (२४)नाकेश्वर - १० ग्रॅम (२५)मोहरी - २५ ग्रॅम (२६) हिंग - १० ग्रॅम (१ खडा) (२७)जायफळ- १ नग (२८) हळद ३५ ग्रॅम ■कृती:- १)सर्व मसाले दुकानातून आणल्यावर स्वच्छ निवडून घ्यावेत.तिरफलमधील बिया काढाव्यात. २)सर्व मिरच्यांची देठे कढईत आणि २ दिवस प्रत्येकी २-३ तास (१२-४या वेळेत) उन्हात वाळवून घ्यावेत. उन्हामध्ये जास्त ठेऊ नये मीरच्या पांढऱ्या होतात. दुकानातून आणल्यावर जात काळ पिशवीत बांधून ठेवू नये वाळवून ठेवू शकता. ३) सर्व मसाले एकेक करून मंद आचेवर मसाल्याचा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यावेत. मसाले करपू देऊ नयेत तसेच कच्चेही ठेवू नयेत. ४) सर्व मसाले भाजून झाल्यावर वेगवेगळे एक पेपरवर थंड होण्यासाठी ठेवावेत ताटात किंवा भांड्यात ठेवू नयेत. ५) मसाले थंड झाल्यावर एकसारखे मसाले व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बारीक दळावेत आणि लहान छिद्राच्या चाळणीने चाळावेत. ६) अशाचप्रकारे मिरच्या वाटून चाळून घ्याव्यात त्यानंतर त्यांनतर मिरची पूड व मसाला पूड एकत्र करावी आणि पुन्हा वाटून चाळून घ्यावी. अश्याप्रकारे आगरी मसाला तयार करावा. ७)तयार मसाला हवाबंद काचेच्या बरणीत तळाशी एक हिंग खडा तसेच मसाला भरून त्यावर एक खडा ठेवून आडोश्याच्या ठिकाणी ठेवावा. लोणचे 👉 • एकदम सोपे चवदार,चटपटीत, लिंबू लोणचे। Lemo... वाळवण 👉 • Видео