У нас вы можете посмотреть бесплатно एक शाम साई के नाम भजन संध्या | ब्रम्होत्सव २०२५ | श्री साई मंदिर पाळधी | २३ वा वर्धापन दिवस | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सद्गुरु श्री साईबाबा, श्री हनुमानजी आणि स्वयंभु गायलमाता मंदीराची थोडक्यात माहिती श्री साईबाबा मंदीर हे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ला लागून असलेल्या पाळधी गावात आहे. श्री साईबाबा मंदीर हे पाळधी गावात राहणारे सुनिल झंवर यांनी श्री साई सेवा समिती चॅरीटेबल ट्रस्टची स्थापना (रजि. नं. ई-१००८ दि.१३/०२/२००४) मध्ये करुन श्री साईबाबांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन श्री साईबाबांच्या मंदीराची स्थापना केली. पाळधी गावातील एका शेतामध्ये श्री गायलमाताची स्वयंभु मूर्ती आढळल्याने श्री साई सेवा समिती चॅरीटेबल ट्रस्टचे सचिव श्री सुनिल झंवर यांनी गायल मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन श्री साईबाबांच्या मंदीराशेजारीच स्वयंभु गायलमाताजी यांच्या मंदीराची स्थापना केली. मंदीरावर साईबाबा, स्वयंभु गायलमाता व श्री हनुमानजी यांच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते मंदीराच्या सभोवतालच्या परिसरात व गावामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये साईबाबांबद्दल श्रध्दा आहे. सदरचे मंदीर हे जिल्ह्याचे ठिकाण जळगांव येथून १२ कि.मी. अंतरावर आहे. तसेच मंदीराला लागून धरणगांव, एकलग्न, मुसळी, पिंप्री, पिंपळकोठा, रवंजा, दोनगांव, टाकळी, सावदा, रिंगणगांव, एरंडोल पांडवकालीन श्रीक्षेत्र पदमालय (शक्तिपीठ) रेल, लाडली, पथराड, अंजनविहीरे, झुरखेडा, चावलखेडा, हनुमंतखेडा, वाघळुद, वराद, सतखेडा, बोरखेडा इत्यादी गावे आहेत. पाळधी गांवाची ग्रामपंचायत मंदीरापासुन एक किलोमीटर अंतरावर आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.६ पासुन सदर मंदीर हे १०० मीटर अंतरावर आहे. मंदीर ट्रस्टच्यावतीने दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या २४,२५ व २६ तारखेला ब्रम्होत्सव (यात्रा) कार्यक्रम साजरा करुन महाप्रसादाचे आयोजन केले जाते. (सदर कार्यक्रम सन २००५ पासुन अखंडीतपणे सुरु आहे. सदर कार्यक्रमास दरवर्षी सरासरी दिड लाख भाविक मंदीरास भेट देऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात. तसेच सदर मंदीरामध्ये दरवर्षी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीला दहीहंडी चा कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच दरवर्षी दस-याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम केला जातो. तसेच दरवर्षी गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना ट्रस्टच्यावतीने वह्या व शालेय साहित्य मोफत वाटप केले जाते. तसेच डिसेंबर महिन्याच्या दि.२४,२५ व २६ रोजी ब्रम्होत्सव कार्यक्रमामध्ये श्री साईबाबांची पालखी पाळधी येथुन श्री क्षेत्र शिर्डी करीता पायी प्रस्थान करते. सलग तीन दिवस साजरा होणाऱ्या ब्रम्होत्सव कार्यक्रमामध्ये सुंदर कांड, प्रख्यात गायकांमार्फत साई भजन संध्या कार्यक्रम राबवुन महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंदीर परिसरामध्ये गरीब लोकांकरीता धर्मार्थ दवाखाना असुन अल्प दरामध्ये औषधी (इंजेक्शन, गोळ्या) इ. सेवा दिल्या जातात. मंदीराशेजारी भव्य असे सभागृह असुन सदर सभागृह हे लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाकरीता अल्पदरात दिले जाते. तसेच ट्रस्टच्यावतीने मंदीर परिसरात १२०० भाकड गायींची गोशाळा असुन गोशाळेचा सर्व खर्च तसेच मंदीर देखभालीचा खर्च व पाळधी गावावरुन जाणा-य पालख्या उदा. शिर्डी, शेंगाव, सप्तश्रृंगी गड इत्यादी पालखीवाल्यांची राहण्याची (मुक्कामाची व जेवणाची व्यवस्था) तसेच सलग तीन दिवस चालणाऱ्या ब्रम्होत्सव व महाप्रसाद इत्यादी सर्व कार्यक्रमाचा खर्च श्री सुनिल झंवर हे करतात. मागील २२ वर्षापासुन सदर मंदीरामध्ये उपरोक्त प्रमाणे कार्यक्रम होत असल्याने सदर मंदीरास राज्य शासनाने शासन निर्णय क्र. तिर्थवि-२०२४/प्र.क्र.३०/यो-११ दि.१९ जुलै २०२४ अन्वये सदर मंदीर तिर्थस्थळास "ब" वर्ग दर्जा दिलेला आहे. तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोग यांचेकडील नोंदणी क्र. MHGA00574 आहे.