У нас вы можете посмотреть бесплатно Bhamer Killa Sakri Dhule | भामेर किल्ला साक्री धुळे | Bhamer Fort | १८४ गुहा व लेण्यांचा समूह или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भामेर ता. साक्री जि.धुळे ******************************** धुळे जिल्ह्यात असणाऱ्या पाच डोंगरी किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर डोंगरी किल्ला म्हणजे भामगिरी अथवा भामेरगड. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धुळे - सुरत महामार्गावर धुळ्यापासून ५० किमी अंतरावर असलेल्या ह्या गडाची उंची समुद्रसपाटीपासून २५०० फुट इतकी आहे. एकेकाळी अहीर राजांची राजधानी असलेला हा किल्ला भामेर गावाभोवती नालेच्या आकारात पसरलेला असुन या किल्ल्याने व शेजारच्या डोंगराने गावाला ३ बाजूंनी कवेत घेतल्यामुळे गावाला नैसर्गिक संरक्षण लाभलेल आहे. उरलेल्या चौथ्या बाजूला दुहेरी तटबंदी व प्रवेशद्वार बांधून त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी गावाला व किल्ल्याला संरक्षित केले होते. भामेर गावाचा इतिहास अतिप्राचीन आहे. प्राचिन काळी येथे भद्रावती नगर होते. त्या काळांत इथे युवनाश्व राजा राज्य करीत होता. सध्याचा संपुर्ण धुळे जिल्हा युवानाश्वाच्या राज्याचा भाग होता. त्याची राजधानी होती सातपुडा पर्वत राजीतले तोरणमाळ हे ठिकाण. मात्र पावसाळ्यात पडणार्या धुंवाधार वृष्टीने युवानाश्व वर्षाकाळात भामेरला येउन रहात असावा. पांडवांनी सोडलेला यज्ञाचा घोडा या राजाने अडवला.तेव्हा पांडवांनी युद्ध करून तो घोडा परत नेला. महाभारत युद्धावेळी हा राजा पांडवांच्या बाजूने लढला. त्याची मुलगी भद्रावती हिच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे ‘‘भामेर’’ होय अशी दंतकथा ह्या कील्याबद्दल सांगितली जाते. दंतकथेप्रमाणे तोरणमाळचा महाभारत कालीन राजा युवनाश्न हा त्याची उपराजधानी भामेर येथे पावसाळ्यात वास्तव्य करून राहत होता. भामेर (भंभगिरी) १००० ते १५०० वर्षांपासून आपला ऐतिहासिक समृद्ध वारसा आजही टिकवून आहे. गडावरील लेणीवरून हा किल्ला सातवाहन काळात अस्तित्वात असावा. मध्ययुगात हा किल्ला व्यापारी दळणवळणाच्या मार्गावरील प्रमुख केंद्रस्थानी होता. खानदेश-बऱ्हाणपूर-सुरत मार्गाच्या प्रदेशावर वर्चस्वासाठी भामेरसारखा मजबूत किल्ला ताब्यात असणं त्यावेळच्या राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं समजलं जाई. नाशिक-धुळे-सुरत या तीनही शहरांकडे जाणारे मार्ग याच भामेरच्या परिसरातून जातात. प्राचीन काळात लेण्या या व्यापारी मार्गावरच कोरल्या गेलेल्या आहेत. येथील जैन लेण्या आजही प्राचीन कलेचा वारसा टिकवून आहेत. १२व्या शतकांत अहिर कुळांतील लक्ष्मीदेव हा राजा भामेरला राज्य करीत होता. तसा शिलालेख आजही येथे आहे. देवगिरीच्या यादव कुळातील जैतुगीचा मुलगा दुसरा सिंधण याच्या सत्ताकाळात सिंधण यादवाच्या सेनापतीने लक्ष्मीदेवाचा पराभव केला. खानदेशात यादव राजांना गवळी राजेही म्हटले जाते. भामेर बहामनीं काळापासून १८ व्या शतकापर्यंत इस्लामी सत्तेच्या वर्चस्वाखाली होते. १८ व्या शतकाच्या सुरूवातीला दाभाडे घराण्याकडे भामेर प्रांताची व्यवस्था आली पण भामेर किल्ला मराठ्यांच्या ताब्यात सन १७५२ मध्ये आला. त्यानंतर भामेर मुलुखाचा सरंजाम विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांच्या नातवाकडे देण्यात आला होता. इंग्रजांनी सन १८१८ मध्ये सगळे किल्ले ताब्यात घेतल्यानंतरही सन १८२० मध्ये कालेखान या पेंढाऱ्याच्या सरदाराने बंड करून भामेर ताब्यात घेतला पण कॅ. ब्रिग्जने हे बंड मोडून काढतांना इथल्या इमारती व तट नष्ट केले असा ह्या गडाचा इतिहास राहिला आहे. ___________________________________________ पोहचण्याचा मार्ग:- धुळे जिल्ह्यातील साक्री शहरापासून नंदुरबार कडे जाताना १० किमी अंतरावर आहे. ___________________________________________ आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा. माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. Please Like Share and Subscribe Channel #भटकंतीसह्याद्रीसमूह @Bhatkanti_Sahyadri_Samuh #Bhatkanti_Sahyadri_Samuh !!धन्यवाद!! __________________________________________ महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. !!धन्यवाद!! / @bhraman_maharashtrache #भ्रमण_महाराष्ट्राचे @Bhraman_Maharashtrache ___________________________________________ Shoot by:- DJI OSMO Action -------------------------------------------------------------------- आमच्या फेसबुक समूहात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://www.facebook.com/groups/82937... इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. / bhatkantisahyadrisamuh / nskharate __________________________________________ Music by video:- Royalty free Music:-YellowTunes / yellowtunes ___________________________________________ Please Like Share and Subscribe Channel Thank You 🙏 ------------------------------------------------------------------- #bhamerfort #dhule #dhulefort #धुळे #भामेर #maharashtrafort #fort #killa #sakri