У нас вы можете посмотреть бесплатно शिवगड || shivgad fort of dajipur || kolhapur forts || maharashtra forts || shivaji mharaj forts или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
shivgad शिवगड (Shivgad) किल्ल्याची ऊंची : 2400 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: दाजीपूर,फोंडा जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : मध्यम कोल्हापूर व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य आहे. या अभयारण्यात अपरिचीत असा शिवगड किल्ला आहे. मालवण, आचरा इत्यादी तळकोकणातील बंदरात उतरणारा माल अनेक घाटमार्गांनी सह्याद्रीच्या पठारावरील बाजारपेठांत जात असे. अशा घाटमार्गांपैकीच फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी शिवगडाची उभारणी करण्यात आली होती. राधानगरी व कळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या व जीववैवध्यतेने नटलेल्या दाजीपूर अभयारण्याला बरेच पर्यटक भेट देतात, पण अभयारण्यातच असलेला शिवगड पाहाण्यास फारसे पर्यटक फिरकत नाहीत. खरेतर थोडासा चढ व आटोपशीर आकार असलेला किल्ला दाजीपूरच्या भेटीत आरामात पहाता येण्यासारखा आहे. Shivgad Shivgad Shivgad पहाण्याची ठिकाणे : शिवगड पाहाण्यासाठी दाजीपूर अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून माणशी रुपये २०/ भरुन प्रवेश घ्यावा लागतो. अभयारण्यातील कच्च्या रस्त्याने फॉरेस्ट रेस्ट हाऊसपर्यंत गेल्यावर एक पायवाट गगनगिरी महाराजांच्या आश्रमापाशी जाते. या वाटेने अर्धातास चालल्यावर आपण शिवगडासमोरील पठारावर येतो. पठार व शिवगड यांच्यामध्ये एक टेकाड आहे. पठारावरुन खाली उतरुन मधल्या टेकाडाला वळसा घालून थोडासा चढ चढून शिवगडावर जाता याते. येथे तटबंदीचे काही अवशेष दिसतात. शिवगडाच्या वायव्य दिशेकडे तोंड करुन असलेल्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. प्रवेशद्वाराचे बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर एक लांबलचक तटबंदी दिसते. गडाचे संरक्षण करण्यासाठी या दुहेरी तटबंदीची योजना केली असावी. तटबंदी ओलांडून पूढे गेल्यावर उजव्या बाजूस एक बूरुज दिसतो. गडाच्या पठारावर एक सुंदर सती शिळा आहे. स्थानीक लोक तीला ‘उगवाई देवी’ म्हणतात. तेथून उत्तरेच्या बुरुजावर गेल्यावर खाली कुर्ली धरण दिसते. तटबंदीच्या कडेकडेने दक्षिण बुरुजापाशी गेल्यावर बुरुजा खालून कोकणातील गडगे सखल गावातून येणारी वाट दिसते, तर दक्षिणेला फोंडा गाव दिसते. या शिवाय गडावर वाड्याचे काही अवशेष आहेत. गडाचा आकार आटोपशीर असल्यामुळे गड पाहाण्यास अर्धातास पुरतो. गड उतरुन परत येताना टेकडाला वळसा घातल्यावर समोरच्या कातळावर धबधब्यांच्या खुणा दिसतात. या धबधब्याजवळ पाण्याचे एक टाक आहे. धबधब्याचे पाणी पाटाने टाक्यात वळवलेले आहे. गडावर पाण्याची व्यवस्था आढळत नाही. या कुंडातील पाण्याचा वापर गडासाठी होत असावा. गडावरुन आजूबाजूचा परिसर पाहात असतांना पूर्वेला दाजीपूरच्या जंगलात एका मंदिराचे शिखर दिसते. मंदिर असलेल्या या परिसराला ‘झांजेचे पाणी’ म्हणतात. गड पाहून परत उगवाईच्या पठारावर येऊन कच्च्या रस्त्यावरुन जंगलाच्या दिशेने चालत गेल्यावर १० मिनिटात आपण मंदिरापाशी पोहोचतो. गगनगिरी महाराज येथे तपसाधनेसाठी बसत असत. या मंदिराच्या मागच्या बाजूला काही घरे आहेत. ती ओलांडून पूढे गेल्यावर एक बारामाही वाहणारा झरा आहे. त्यास झांजेचे पाणी म्हणतात. येथून शिवगडाचे दर्शन होते. येथून अर्ध्यातासात परत अभयारण्याच्या प्रवेशद्वाराशी जाता येते. याशिवाय दाजीपूर अगयारण्याची भटकंती सुध्दा करता येते. अभयारण्यात भटकंतीसाठी २१ किमी चा कच्चा रस्ता आहे. गाईड सोबत घेऊन जंगल पाहाणे सोईचे आहे. पोहोचण्याच्या वाटा : १) कोल्हापूरहून दाजीपूर अभयारण्याचे प्रवेशद्वार ८० किमी वर आहे. कोल्हापूरहून मालवण, कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले येथे जाणार्या एसटी बसने २:३० तासात दाजीपूरला पोहोचता येते. अभयारण्याच्या प्रवेशद्वारापाशी माणसी २०/- रुपये भरुन प्रवेश घेता येतो. प्रवेशद्वारापासून ३ किमी वर उगवाईचे पठार आहे, तेथपर्यंत कच्च्या रस्त्याने खाजगी वहानाने किंवा चालत जाता येते. २) शिवगडाच्या पायथ्याशी गडगेसखल गाव आहे. कोकणातील फोंडा घाटाच्या पायथ्याशी असलेले हे गाव; फोंड्यापासून ६ किमी वर आहे. या गावातून दोन तासात दक्षिण बुरुजाच्या खालून शिवगडावर प्रवेश करता येतो. राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही, पण दाजीपूर अभयारण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रहाण्याची सोय आहे. जेवणाची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पाण्याची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, पण दाजीपूर गावात होऊ शकेल. सूचना : दाजीपूर अभयारण्य जून ते ऑक्टोबर बंद असते. अभयारण्यात गाईड घेऊन गेल्यास किल्ला व अभयारण्य एका दिवसात व्यवस्थित पाहता येते.