У нас вы можете посмотреть бесплатно किल्ले साल्हेर || महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
उंची: १५६७ मीटर समुद्र सपाटीपासून. ५६७ मीटर पायथ्यापासून, चढ़ाई - मध्यम मुल्हेर राजधानी होती, तर साल्हेर त्या राजधानीचा मुख्य केंद्रबिंदू होता, साल्हेर जिंकला, तर राजधानी त्याची हे सरळ सरळ गणितच होते. साल्हेर किल्ला म्हणजे सह्याद्री पर्वतातील प्रचंड मोठा हत्ती प्रमाणे अवाढव्य आकाराचा किल्ला. शिखर भागावर एवढी सपाटी की, पाच हजार माणसे सहज ऐसपैस बसतील. किल्याचे कपारी, बाजूचे कडे, एवढे प्रचंड आहेत की, वाऱ्यालादेखील तेथून वाहताना भय वाटावे. माणूस तर सोडाच पण, पाण्याच्या धारेलासुद्धा वरून खाली येतांना विचार करावा लागत असेल. हा महाराष्ट्रातील सर्वोच्च गड असून, डोलबारी डोंगर रांगेत मुडतो. साल्हेर किल्ल्याचे बांधकाम आणि वर्णन-साल्हेर किल्ल्यावर जाताना तीन प्रचलित मार्ग आहेत. १) पहिला रस्ता - वाघांबे गावाकडून छोट्या पायवाटीवरून, सरळ टोक टेकड्या पार केल्या की, आपण साल्हेर-सालोट्याच्या खिंडीत पोहोचतो. २) दुसरा रस्ता महारदर गावाकडून एका शेतातून चालत गेल्यावर काही वीरगळी बघत दुधमाळ ह्या टेकडीवर पोहोचतो. येथून खिंड सुरू होते येथे दोन मार्ग फुटतात. एक खिंडीतून आर आणि दुसरा हत्तीच्या डोममार्गे. अगोदर हत्तीची डोम बघू, दुर्गवीरतर्फे हा प्राचीन मार्ग साफसफाई करून रस्ता बनवला. थोडे अवघड आहे पण, हत्तीच्या कपाळासारखा भाग लागतो. येथे कातळात पायऱ्या कोरल्या आहेत. त्या पार केल्या की, सरळ मागील दरवाज्यातच पोहोचतो. आणि खिंडीतून आपण साल्हेर सालोट्याच्या माचीवर पोहोचतो. ही खिंड साल्होटाच्या था पायथ्यापासून म्हणजे महारदर या गावापासून ९१३ फूट उंचीवर आहे. ही टेकडी चढून गेल्यावर साल्हेर साल्होटाच्या खिंडीत पोहोचतो. ही सपाट खिंड समुद्र सपाटीपासून १२८० मीटरवर आहे. येथून डावीकडे साल्हेर व उजवीकडे कड्या कातळाचा साल्होटा आपले लक्ष वेधीत असतो. साल्होटा बघून आपण साल्हेरची वाट पकडावी. येथून काही पायऱ्या चढून गेल्यावर कातळ कडा खोदून व तासून दरवाजे व पायऱ्या तयार केल्या आहेत. हे सर्व बघताना आपल्या पूर्वजांची कामावरील निष्ठा व आत्मीयता आपल्याला त्या निर्मितीला वंदन करण्यास भाग पाडते. एका रांगेत तयार केलेले अतिशय सुंदर असे खोदीव टाके व देवड्या आपले लक्ष वेधून घेतात. ही मागची वाट थरारक व सोप्पी ही आहे. या मार्गाने आपण सरळ 'गंगासागर' तलावाजवळ पोहोचतो. पूर्वी येथील सुरती पोल या दरवाजाखालील 'सुळ्या' बुरजावरून खाली काळाकुंडात देहदंडाची शिक्षा दिली जात असे या मार्गातील दुसऱ्या दरवाज्यात देवनागरी लिपीत कोरलेला मराठी भाषेतील शिलालेख आहे. पण अक्षरे खूपच अस्पष्ट झाली आहेत. तेथे एकूण सहा दरवाजे आणि एक फारसी शिलालेख आहे. बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर– मुल्हेरचे किल्ले महाराष्ट्राला ज्ञात आहेत. शिवाजी महाराज सुरत लुटीतून परतताना साल्हेर किल्ल्यावर थांबले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून अनेक पर्यटक व गिर्यारोहक साल्हेर किल्ल्याला भेट देण्यास येत असतात. कळसुबाईचे शिखर हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे उंच शिखर आहे तर साल्हेर किल्ला हा दुसर्या क्रमांकाचा उंच किल्ला आहे. साल्हेर- मुल्हेर या किल्ल्यांवर प्रचंड जंगल होते. मात्र आज ते किल्ले पूर्णपणे उघडेबोडके आहेत. परिसर म्हणजेच बागलाण परिसराची संस्कृती ही ग्रामसंस्कृती आहे. भाषिकदृष्ट्या अहिराणी भाषिक संस्कृती आहे आणि शेती ही त्या भागाची मूळ लोकसंस्कृती आहे. सटाण्याला पूर्वी मामलेदार हे पद नव्हते. सटाणा मालेगावच्या अखत्यारीत येत असे. यशवंत भोसेकर यांच्या 1869 च्या नियुक्तीने बागलाणला पहिले मामलेदार मिळाले. ब्रिटिश सरकारने बागलाण तालुक्यासाठी सटाण्याला मामलेदार कचेरी स्थापन केली. यशवंत भोसेकर हे सटाणा येथे 8 मे 1869 रोजी रूजू झाले. ते 1869 पासून 1873 पर्यंत बागलाणात होते. ते देवध्यानी, धार्मिक आणि परोपकारी वृत्तीचे होते. त्या परिसरात ओला दुष्काळ 1872 साली पडला. भोसेकर लोक भुकेने मरत असलेले पाहून अस्वस्थ झाले आणि त्यांनी सरकारी खजिना लोकांना वाटून टाकला. इंग्रज सरकारने त्यांना बरखास्त केले तरी ते लोकांचे देव झाले, म्हणून देवमामलेदार. त्यांच्या मृत्यूनंतर सटाण्यात त्यांचे भव्य मंदिर बांधण्यात आले. दरवर्षी तेथे भव्य रथ निघतो. पंधरा दिवस मोठी यात्रा भरते. देवमामलेदार हे सटाण्याचे लोकदैवत झाले. आजूबाजूच्या खेड्यांवरील लोकसुद्धा गावाजवळच्या आरम नदीकाठी देवमामलेदार यांच्या मंदिरात दर्शन घेण्यास कायम जात असतात. गावात कोणाकडे येणारे पाहुणेलोक गावदेवतेचे दर्शन मुद्दाम घेतात. मयुरनगरीतील (मुल्हेर) तळ्यात दोन मूर्ती सापडल्या. त्यांपैकी नारायणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मुल्हेर येथील उद्धव महाराजांच्या मंदिराजवळ 1873 साली केली गेली. दुसरी मूर्ती महालक्ष्मीची होती. मामलेदार भोसेकर यांनी नारायण महाराज यांची मूर्ती सटाण्याला आणून तिची प्राणप्रतिष्ठा आरम नदीच्या काठी केली. तेथे छोटेसे मंदिरही बांधण्यात आले. ते दैवतही सटाण्याचे वैभव आहे. किल्ले साल्हेर || महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला किल्ले साल्हेर उंच किल्ला मराठा उद्ध शिवाजी महाराजांनी जिंकला हा किल्ला Instagram link - https://www.instagram.com/mr_omiiiiii... Instagram link - https://www.instagram.com/durgpremi20... #capcut #omkarnivdunge #instagram #salher #salher fort #fort #vasota #shivaji mharaj #किल्ले_साल्हेर || महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला #साल्हेर Map- https://maps.app.goo.gl/QMNUV6cC5rg6S...