У нас вы можете посмотреть бесплатно Garja Jayjaykar Kranticha | | Kusumagraj UPSC MARATHI LIT OPTIONAL или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
You can purchase the book from : https://amzn.to/4hkvvzS (Vishakha Kusumagraj / Fulrani Balkavinchi Nivdak Kavita Balkavi Set of 2 Books) क्रांतीचा जयजयकार (अन्नत्याग करून मृत्यूच्या दारात पाऊल टाकताना राजबंद्यांच्या ओठावर असलेच गाणे स्फुरले नसेल काय?) गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार ! खळखळुद्या या अदय शृंखला हातापायांत पोलादाची काय तमा मरणाच्या दारात ? सर्वांनो उद्दाम, आवळा कसूनिया पाश पिचेल मनगट परी उरातिल अभंग आवेश तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार कधीही तारांचा संभार गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार ! कुद्ध भूक पोटात घालुद्या खुशाल थैमान कुरतडुद्या आतडी करूद्या रक्ताचे पान संहारक काली, तुज देती बळीच आव्हान बलशाली मरणाहुन आहे अमुचा अभिमान मृत्युंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार? अहो हे कसले कारागार? गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार! पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती होउनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती कधि न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे बांधु न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार होता पायतळी अंगार गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार! श्वासांनो, जा वायूसंगे ओलांडुनि भिंत अन् आईला कळवा आमुच्या हृदयातील खंत सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात तुझ्या मुक्तिचे एकच होते वेड परी अनिवार तयांना वेड परी अनिवार गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार! नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात चरणांचे तव पूजन केले म्हणुनि गुन्हेगार देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर देशिल ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार आई, वेड्यांना आधार गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार ! कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते लोहदण्ड तव पायांमधले खळाखळा तुटणार आई, खळाखळा तुटणार गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार ! आता कर ओंकारा, तांडव गिळायला घास नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास रक्तमांस लुटण्यास गिधाडे येउ देत क्रूर पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर शरिरांचा कर सुखेनैव या सुखेनैव संहार मरणा, सुखेनैव संहार गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार !