У нас вы можете посмотреть бесплатно मुंबई येथे भाईकडे चालला होता हा ट्रक! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मुंबई येथे भाईकडे चालला होता हा ट्रक ! #godfathernews #shirdi #ahilyanagar #marathi #marathinews #police ▶️ हा मासा अनेकदा अस्वच्छ तलावात, कचरा/कत्तलखान्याचा उरलेला भाग खाऊन वाढवला जातो. काही ठिकाणी वाढ वेगाने व्हावी म्हणून प्रतिजैविके (antibiotics) किंवा रसायने वापरली जातात. अशा अवशेषांमुळे पचनसंस्थेचे त्रास, उलट्या-जुलाब, अॅलर्जी होऊ शकते. दीर्घकाळ सेवन केल्यास शरीरात हानिकारक घटक साठण्याची भीती व्यक्त केली जाते. ▶️ अन्नातून होणारे संसर्ग अस्वच्छ पाण्यात वाढल्याने बॅक्टेरिया/परजीवी संसर्गाचा धोका वाढतो. नीट शिजवला नसेल तर फूड पॉइझनिंग होऊ शकते. ▶️ अँटिबायोटिक रेझिस्टन्सचा धोका अनियंत्रित प्रतिजैविक वापरामुळे मानवी शरीरात अँटिबायोटिक-प्रतिरोधक जंतू वाढण्याची शक्यता तज्ञांनी मांडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/दिपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरकान शेख, राहुल डोके, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, सतिष भवर, चालक उमाकांत गावडे, उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करुन शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेकामी पथकास रवाना केले. दिनांक 03/03/2026 रोजी शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत ट्रक नंबर WB25M5023ú यामध्ये केंद्र सरकारने प्रतिबंधीत केलेले मांगुर मासे भरुन नगर मनमाड हायवे रोडवरील निमगाव बायपास रोड चौक येथुन जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोउपनि/ सागर काळे व पोलीस अंमलदार यांना बोलावुन घेवुन निमगाव बायपास रोडवर सापळा रचुन ट्रक क्रमांक WB25M5023 हा ताब्यात घेवुन त्यामध्ये खात्री केली असता ट्रकचे केबिनमध्ये प्रतिबंधीत मांगुर मासे असल्याचे आढळुन आले. ट्रकमध्ये मिळुन आलेल्या इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) स्वपन नियम डे वय-36 वर्षे रा. बामनगज थाना दत्तपुकुर जि.बाराशाद पश्चिम बंगाल, 2) मकबुल रौफ सरदार वय- 31 वर्षे रा. मसलंदापुर, निमतला तालुका गोवडमा जि. नॉर्थ 24 परगना, पश्चिम बंगाल, 3) कुतुब आयुब मंडल वय- 35 वर्षे रा. मंदीया थाना बदुडीया जि. नॉर्थ 24 परगना, पश्चिम बंगाल, 4) मृत्युंजय मुकुल विश्वास वय-27 वर्षे रा. हाबरा थाना हाबरा जि. नॉर्थ 24 परगना, पश्चिम बंगाल असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांकडे त्यांचे ताब्यात मिळुन आलेले मांगुर मासे कोठुन आणले आहे व कोणाकडे घेवुन जाणार आहे याबाबत विचारपुस करता त्यांनी सदरचे मासे हे मिराज (पुर्ण नाव माहिती नाही) याने पश्चिम बंगाल येथुन भरुन दिलेले असुन ते खोपोली मुंबई येथे भाई (पुर्ण नाव माहित नाही) याचेकडे घेवुन जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर पथकाने प्रतिबंधीत मांगुर माशाने भरलेला ट्रक खात्री कामी शिर्डी पोलीस ठाणे येथे नेवुन मत्स विकास अधिकारी सौ. प्रतिक्षा सुधाकर पाटेकर यांचेशी संपर्क करुन ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकमधील माशांची खात्री करणेकामी संपर्क केला असता सौ. प्रतिक्षा सुधाकर पाटेकर यांना दिनांक 03/03/2026 रोजी शिर्डी पोलीस ठाणे या ठिकाणी येवुन नमुद ट्रकमधील माशांची खात्री केली असता त्यामध्ये प्रतिबंधीत मांगुर मासे असल्याचा अभिप्राय दिला. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडुन 4,00,000/- रुपये किमतीचे 400 किलो प्रतिबंधीत मांगुर मासे व 25,00,000/- रुपये किमतीचा ट्रक असा एकुण 29,00,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन प्रतिबंधीत मासे कायदेशीर प्रक्रिया करुन नाश करण्यात आले आहेत. ताब्यातील इसमांविरुध्द मत्स विकास अधिकारी सौ. प्रतिक्षा सुधाकर पाटेकर, मत्सव्यवसाय विकास अधिकारी, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 160/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 275, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करीत आहेत. सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.