У нас вы можете посмотреть бесплатно चालू समास निरूपण दासबोध दशक 16 समास 10 | dasbodh chalu samas nirupan dashak 16 samas 10 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
समास दहावा : गुणभूतनिरूपण ॥ श्रीरामसमर्थ ॥ पंचभूतें चाले जग । पंचभूतांची लगबग । पंचभूतें गेलियां मग । काये आहे ॥ १ ॥ श्रोता वक्तयास बोले । भूतांचे महिमे वाढविले । आणि त्रिगुण कोठें गेले । सांगा स्वामी ॥ २ ॥ अंतरात्मा पांचवे भूत । त्रिगुण त्याचें अंगभूत । सावध करूनियां चित्त । बरें पाहें ॥ ३ ॥ भूत म्हणिजे जितुकें जालें । त्रिगुण जाल्यांत आले । इतुकेन मूळ खंडलें । आशंकेचें ॥ ४ ॥ भूतांवेगळें कांहीं नाहीं । भूतजात हें सर्व हि । येकावेगळें येक कांहीं । घडेचिना ॥ ५ ॥ आत्म्याचेनी जाला पवन । पवनाचेन प्रगटे अग्न । अग्नीपासून जीवन । ऐसें बोलती ॥ ६ ॥ जीवन आवघें डबाबिलें । तें रविमंडळें आळलें । वन्हीवायोचेन जालें । भूमंडळ ॥ ७ ॥ वन्ही वायो रवी नस्तां । तरी होते उदंड सीतळता । ते सीतळतेमधें उष्णता । येणें न्यायें ॥ ८ ॥ आवघें वर्मासी वर्म केलें । तरीच येवढें फांपावलें । देहेमात्र तितुकें जालें । वर्माकरितां ॥ ९ ॥ आवघें सीतळचि असतें । तरी प्राणीमात्र मरोनी जातें । आवघ्या उष्णेंचि करपते । सकळ कांहीं ॥ १० ॥ भूमंडळ आळोन गोठलें । तें रविकिर्णें वाळोन गेलें । मग सहज चि देवें रचिलें । उपायासी ॥ ११ ॥ म्हणोनी केला प्रज्यन्यकाळ । थंड जालें भूमंडळ । पुढेंउष्ण कांहीं सीतळ । सीतकाळ जाणावा ॥ १२ ॥ सीतकाळें कष्टले लोक । कर्पोन गेलें वृक्षादिक । म्हणोन पुढें कौतुक । उष्णकाळाचें ॥ १३ ॥ त्याहिमधें प्रातःकाळ । माध्यानकाळ सायंकाळ । सीतकाळ उष्णकाळ । निर्माण केले ॥ १४ ॥ ऐसें येकामागें येक केलें । विलेनें नेमस्त लाविलें । येणेंकरितां जगले । प्राणीमात्र ॥ १५ ॥ नाना रसें रोग कठिण । म्हणोनी औषधी केल्या निर्माण । परंतु सृष्टीचें विवरण । कळलें पाहिजे ॥ १६॥ देहेमूळ रक्त रेत । त्या आपाचे होती दात । ऐसीच भूमंडळीं प्रचित । नाना रत्नांची ॥ १७ ॥ सकळांसी मूळ जीवन बांधा । जीवनें चाले सकळ धंदा । जीवनेंविण हरिगोविंदा । प्राणी कैचे ॥ १८ ॥ जीवनाचें मुक्ताफळ । शुक्रासारिखें सुढाळ । हिरे माणिके इंद्रनीळ । ते जळें जाले ॥ १९ ॥ महिमा कोणाचा सांगावा । जाला कर्दमुचि आघवा । वेगळवेगळु निवडावा । कोण्या प्रकारें ॥ २० ॥ परंतु बोलिलें कांहींयेक । मनास कळावया विवेक । जनामधें तार्किक लोक । समजती आघवें ॥ २१ ॥ आवघें समजलें हें घडेना । शास्त्रांशास्त्रांसीं पडेना । अनुमानें निश्चय होयेना । कांहींयेक ॥ २२ ॥ अगाध गुण भगवंताचे । शेष वर्णूं न शके वाचें । वेदविधी तेहि काचे । देवेंविण ॥ २३ ॥ आत्माराम सकळां पाळी । आवघें त्रयलोक्य सांभाळी । तया येकेंविण धुळी । होये सर्वत्रांची ॥ २४ ॥ जेथें आत्माराम नाहीं । तेथें उरों न शके कांहीं । त्रयलोकीचे प्राणी सर्व हि । प्रेतरूपी ॥ २५ ॥ आत्मा नस्तां येती मरणें । आत्म्याविण कैचें जिणें । बरा विवेक समजणें । अंतर्यामीं ॥ २६ ॥ समजणें जें विवेकाचें । तेंहि आत्म्याविण कैचें । कोणीयेकें जगदीशाचें । भजन करावें ॥ २७ ॥ उपासना प्रगट जाली । तरी हे विचारणा कळली । याकारणें पाहिजे केली । विचारणा देवाची ॥ २८ ॥ उपासनेचा मोठा आश्रयो । उपासनेविण निराश्रयो । उदंड केलें तरी तो जयो । प्राप्त नाहीं ॥ २९ ॥ समर्थाची नाहीं पाठी । तयास भलताच कुटी । याकारणें उठाउठी । भजन करावें ॥ ३० ॥ भजन साधन अभ्यास। येणें पाविजे परलोकास । दास म्हणे हा विश्वास । धरिला पाहिजे ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुणभूतनिरूपणनाम समास दहावा ॥ ॥ दशक सोळावा समाप्त ॥ #dasbodh #दासबोध #दासबोधनिरूपण #चालूसमास #chalusamasnirupan