У нас вы можете посмотреть бесплатно नारळाच्या झाडांची लागवड कशी करावी नारळ झाडे माहिती नारळ लागवड आणि उत्पादन Coconut Farming или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नारळाच्या झाडांची लागवड कशी करावी नारळ झाडे माहिती नारळ लागवड आणि उत्पादन Coconut Farming नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत. दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे, यांसारख्या समस्या दिसतात. पानाचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर 3.25 ते 3.5 मीटर असते. म्हणून दोन माडांत 7.5 मीटर अंतर असेल तर नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत किंवा एकमेकांना झाकणार नाहीत. .*DOWNLOAD APP --- https://play.google.com/store/apps/de... WHATSAPP https://wa.me/919172800247 VISIT OUR WEBSITE https://agrowone.in/ 📞📞 https://wa.me/919172800247 माडापासून योग्य प्रमाणात उत्पन्न मिळण्यासाठी नवीन सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत 7.5 मीटर अंतर ठेवावे. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची असल्यास 6.75 किंवा सात मीटर अंतर ठेवले तरी चालेल. ठेंगू जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते.उंच जाती 1) वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) - या जातीचे आयुष्यमान 80 ते 100 वर्षे असून सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी 80 ते 100 फळे मिळतात. 2) लक्षद्वीप ऑर्डिनरी - या जातीची झाडे आणि फळे बाणवलीसारखीच असतात, परंतु फळाच्या तीनही कडा उठावदार असतात, पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी 150 फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी 140 ते 180 ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण 72 टक्के असते. 3) प्रताप - नारळाचा आकार मध्यम, गोल असून ती सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून 150 नारळ मिळतात. 4) फिलिपिन्स ऑर्डिनरी - ही उंच प्रकारातील जात आहे. या जातीचे नारळ आकाराने फारच मोठे असतात. एका नारळापासून सरासरी 213 ग्रॅम खोबरे मिळते, तर नारळाचे उत्पादन 94 ते 159 असून सरासरी 105 नारळ आहे. ठेंगू जाती या जातीची झाडे उंचीने ठेंगू असतात आणि लवकर म्हणजे लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुलोऱ्यात येतात. ठेंगू जातीचे आयुष्यमान 30 ते 35 वर्षे असते. रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. त्यातील ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम असून तिच्या 100 मि.लि. पाण्यात सात ग्रॅम एवढे साखरेचे प्रमाण असते. संकरित जाती 1) टी - डी (केरासंकरा) - या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. एका झाडापासून 100 ते 160 नारळ फळे, तर सरासरी 150 नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68 टक्के इतके असते. 2) टी - डी (चंद्रसंकरा) - या संकरित जातीची फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रति वर्षी 55 ते 158 फळे असते, तर सरासरी उत्पादन 116 फळे आहे. 02352-255077 प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी #agrowon,#agrowonmarathi,#agrowonsuccessstory #ॲग्रोवन , ऑनलाइन भेट द्या ------------------------------------------------------- 📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/de... 🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com 👍 फेसबुक - / agrowone 📸 इंस्टाग्राम - / agrowone ट्विटर - / agrowone टेलेग्राम - https://t.me/Agrowone ------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone