У нас вы можете посмотреть бесплатно भारताची कृषी बाजारपेठ खुली होणार नाही | Devendra Fadnavis परळीतील महापशुधन प्रदर्शनात स्पष्ट भूमिका или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भारताची कृषी बाजारपेठ कुणासाठीही खुली होणार नाही, शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. बीड जिल्ह्यातील परळी येथे प्रथमच आयोजित राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय महापशुधन प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. भारत-अमेरिका कृषी कराराबाबत विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सावध राहण्याचं आवाहन केलं. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मोठी पावलं उचलली असून महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. राज्यातील १९ जिल्ह्यांत दुग्ध विकासाचा दुसरा टप्पा विस्तारला असून ३६६ प्रकल्पांसाठी २१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. #DevendraFadnavis #Agriculture #Parli #DairyDevelopment #Maharashtra