У нас вы можете посмотреть бесплатно रत्नागिरीतील विपश्यना केंद्र आणि उपासकांचा 10 दिवसाचा अनुभव गाव -पाथरट, पोस्ट-पाली जि.रत्नागिरी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Dhamma.org (धम्मा.ऑर्ग) Dhamma Pades Konkan Vipassana Meditation Center Ratnagiri, At Patharat, Post - Pali Tal & Dist.Ratnagiri.Maharashtra Pin.415 803 Ratnagiri -415803 Maharashtra, India Tel: 9975434754 Email: info@pades.dhamma.org Website: https://pades.dhamma.org/ #विपश्यना काय आहे? ही दुःखमुक्तिची साधना आहे. ही मनाला निर्मळ करणारी अशी साधना आहे, ज्यामुळे साधक जीवनांतील चढ-उतारांचा सामना शांतिपूर्वक तसेच संतुलित राहून करु शकेल. ही जीवन जगण्याची कला आहे ज्यापासून साधक एका स्वस्थ समाजाच्या निर्मितीमध्ये सहयोगी होतो. विपश्यना साधनेचे उच्चतम आध्यात्मिक लक्ष्य विकारांपासून संपूर्ण मुक्ती आणि बोधि प्राप्त करणे आहे. साधनेचा उद्देश केवळ शारिरीक दुःखांपासून मुक्ती नाही. परंतु, चित्तशुद्धीमुळे कित्येक मनोशारीरिक (सायकोसोमॅटिक) आजार आपोआप दूर होतात. वस्तुतः विपश्यना ही दुःखाची मूळ तीन कारणे - मोह, द्वेष तसेच अविद्या दूर करते. तर जो कुणी ह्या साधनेचा नियमित अभ्यास करत राहिला तर एकेक पाऊल पुढे जात राहून आपल्या मानसिक विकारांपासून पूर्ण मुक्त होऊन नितांत विमुक्त अवस्थेचा साक्षात्कार करू शकतो. #विपश्यना काय नाही: विपश्यना अंधश्रध्देवर आधारीत कर्मकांड नाही. ही साधना बौध्दिक मनोरंजन किंवा दार्शनिक वादविवादासाठी नाही. ही सुट्टी घालविण्यासाठी किंवा सामाजिक आदानप्रदानासाठी नाही. ही रोजच्या जीवनातल्या ताणतणावापासून पलायन करविणारी साधना नाही. विपश्यना साधना परिचय विपश्यना (Vipassana) ही भारताची एक अत्यंत प्राचीन ध्यान-विधि आहे. मानवजातिपासून हरवलेली,आजपासून जवळजवळ २५०० वर्षांपूर्वी गौतम बुध्दाने पुन्हा शोधून काढली होती. विपश्यना शब्दाचा अर्थ असा की, जी वस्तू खरोखरच जशी आहे, ती त्याच प्रकारे जाणून घेणे. स्व-निरिक्षणाद्वारे आत्मशुद्धी करण्याची ही प्रक्रिया(साधना) आहे. कुणिही मनाच्या एकाग्रतेसाठी नैसर्गिक श्वासाच्या निरीक्षणाव्दारे सुरूवात करतो. तीक्ष्ण सजगतेने शरीर व चित्ताच्या बदलत्या जातिस्वभावाचे निरिक्षण करु लागतो आणि नश्वरता,दुःख व अहंभावाच्या जागतिक सत्याचा अनुभव घेतो. प्रत्यक्ष अनुभवाद्वारे ह्या सत्याची अनुभूती ही एक शुध्दीकरणाची प्रक्रिया आहे. हा संपूर्ण मार्ग(Dhamma) म्हणजे जागतिक वाद-विषयांवर एक जागतिक उपाय आहे आणि ह्याचे कोणत्याही संघटित धर्म किंवा संप्रदायाशी देणे घेणे नाही. ह्याच कारणामुळे, कुणिही, वंश,समाज किंवा धर्मामुळे होणाऱ्या झगड्याशिवाय कोणत्याही वेळी, ह्याचा मुक्तपणे अभ्यास करु शकतो, आणि सर्वांना एकसारखी फायदेशीर असल्याचे सिद्ध होईल. #आर्य मौन शिबिराचा आरंभ झाल्यापासून दहाव्या दिवशी साधारणतः सकाळी दहापर्यंत आर्यमौन म्हणजेच शरीर तसेच वाणीने मौन पाळावे लागेल. दुसऱ्याबरोबर शारीरीक संकेताव्दारे किंवा लिहून वाचून विचार विनिमय करण्यास मनाई आहे. अत्यंत आवश्यक असेल तेव्हा साधकांना अन्न, रहाण्याची सोय, शरीर स्वास्थ, इत्यादिसंबधी व्यवस्थापन आणि विधि समजावून घेण्यासाठी आचार्यांबरोबर बोलण्याची सूट आहे. विपश्यना साधना हा व्यक्तिगत अभ्यास आहे. परंतु ह्या संपर्काच्या वेळी देखील कमीतकमी बोलावे. प्रत्येक साधकाने स्वतःला एकटे समजून एकांतात असल्याप्रमाणे साधनेत व्यग्र व्हावे. #kokanipravartak #youtube #Dhammapades_Konkan_Vipassana_Meditation_centre #Ratnagiri अत्यंत आवश्यक असेल तेव्हा साधकांना अन्न, रहाण्याची सोय, शरीर स्वास्थ, इत्यादिसंबधी व्यवस्थापन आणि विधि समजावून घेण्यासाठी आचार्यांबरोबर बोलण्याची सूट आहे. विपश्यना साधना हा व्यक्तिगत अभ्यास आहे. परंतु ह्या संपर्काच्या वेळी देखील कमीतकमी बोलावे. प्रत्येक साधकाने स्वतःला एकटे समजून एकांतात असल्याप्रमाणे साधनेत व्यग्र व्हावे. #रत्नागिरीमेडिटेशनसेंटर #pathrat #meditation #vippasana #shanti #पाली #पालिमेडिटेशनसेंटर नमस्कार मित्रांनो कोकणी प्रवर्तक या यूट्यूब चैनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे या सदर व्हिडिओ मध्ये कोकणामधील एक भाग व शेतीतील एक भाग हा तुमच्यासमोर व्हिडिओद्वारे शेअर केलेला आहे तरी हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.. #kokanipravartak #youtube #वहाळ #like_share_subscribe