У нас вы можете посмотреть бесплатно ऊन ऊन खिचडी (Un Un Khichadi)| Marathi Kavita | Spruha Joshi | Poems или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपल्या YouTube Channel वरील कवितांच्या फर्माईशींमधील प्रमोद सोनार यांची एक फर्माईश अशी होती की 'ऊन ऊन खिचडी' ही कविता ऐकायला मिळावी. त्याचा विडिओ तुच्यासोबत share करतेय. कविता सादरीकरण आवडलं तर नक्की कळवा. ऊन ऊन खिचडी साजुकसं तुप, वेगळं राहायचं भारीच सुख. एक नाही दोन नाही माणसं बारा, घर कसलं मेलं ते बाजारच सारा. सासुबाई- मामंजी,नणंदा नी दीर, जावेच्या पोराची सदा पीर पीर. पाहुणे रावणे सण नी वार, रांधा वाढा जीव बेजार. दहा मध्ये दिलं ही बाबांची चुक, वेगळं राहायचं भारीच सुख. सगळ्यांना वाटतं माझ घर प्रेमळ, प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू, अन् एवढासा जीव झाला तरी विंचु तो विंचु. चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी, वीतभर लाकडाला हातभर झिलपी. बाबांची माया काय मामंजीना येते, पाणी तापवलं म्हणुन साय का धरते? बहीण अन् जाऊ यात अंतरच खुप, वेगळ राहायचं भारीच सुख. दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा, दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं, गुलुगुलु बोलायचं नी दुर दुर फिरायच. आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी, फिटतील साऱ्या बाई आवडी निवडी. दोघांचा असा स्वयंपाकच काय? पापड मेतकुट अन् दह्याची साय , त्यावर लोणकढ साजुक तुप, वेगळं राहायचं भारीच सुख. रडले पडले नी अबोला धरला, तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला. पण मेलं यांच काही कळतच नाही, महिन्याचा पगार कसा पुरतच नाही. साखर आहे तर चहा नाही, तांदुळ आहेत तर गहु नाही. ह्यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी, घोटभर पाणि द्यायला पण बायकोच हवी बाळ रडल तर ते खपायचं नाही, मिनीटभर कसं त्याला घ्यायचही नाही. स्वयपाक करायला मीच, बाळ रडलं तरी घ्यायचं मीच. भांडी घासायची मीच, अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच. जिवाच्या पलीकडे काम झाल खुप, वेगळं रहायच कळायला लागल सुख. सासुबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या, सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे, बाजारहाट करायला भावजी जायचे. कामात जावेची मदत व्हायची, नणंद बिचारी ऊर नीपुर निस्तरायची. आत्ता काय कुठल्या हौशी नी आवडी, बारा महिन्याला एकच साडी. थंडगार खिचडी, संपलय तुप, अन् वेगळं व्हायचं कळलय सुख!! प्राध्यापक मो.दा.देशमुख #SpruhaJoshi #Marathi #Kavita ------------------------------------**************************---------------------------- DISCLAIMER : This is the official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved. ___________________________________________________________________ Follow for regular updates about my work on 👉 Facebook : / spruhavarad 👉 Twitter : / spruhavarad 👉 Instagram : / spruhavarad