У нас вы можете посмотреть бесплатно Ghangad Fort | Ghangad Fort Trek | घनगड किल्ला | ऐकोले или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Ghangad Fort, Ghangad Fort Trek किल्ले घनगड, ऐकोले. #ghangad #ekole #valley #ekolevalley #fort #lonavala #mountains #peshvai #trek #maharashtra इतिहास: मुळशी धरणाच्या पश्चिमेला असलेल्या मावळाला ‘कोरसबारस’ मावळ म्हणतात. याच मावळात येणारा हा घनगड हा आड बाजूला असलेला छोटेखानी किल्ला आहे. प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली असे. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा - खंडाळा परीसरात येण्यासाठी प्राचिन काळापासून दोन घाटमार्ग आहेत. १) पाली - सरसगड - ठाणाळे लेणी - वाघजाई घाट - तैलबैला - कोरीगड. २) पाली - सरसगड - सुधागड - सवाष्णीचा घाट - घनगड - तैलबैला - कोरीगड. याचा उपयोग टेहळणीसाठी व कैदी ठेवण्यासाठी केला जात होता. इतिहासात या गडाची अजूनही काही नावे सापडतात, ती अशी एकोल्याचा किल्ला, कोट अंकोला, धनगड. इ. स. १६६५ च्या जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व मुघल सेनानी मिर्जाराजा जयसिंग यांच्यात पुरंदरचा प्रसिद्ध तह झाला. त्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातले २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यात घनगडाचा समावेश होता. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यू नंतर औरंगजेब मुघली आक्रमनातं घनगड मुघलांकडे गेला. पंताजी शिवदेव सोमण (कारकीर्द शके १६१६ ते १६३३) यांनी शंकराजी नारायण सचिव यांच्या आज्ञेने घनगड मुघलांकडून जिंकून घेतला. इ. स. १७१३ मध्ये शाहू राजांकडे असलेला घनगड कान्होजी आंग्रे यांनी जिंकून घेतला. दि. २८ फेब्रुवारी १७१४ रोजी तह झाला आणि त्यात कान्होजीनी घनगड किल्ला शाहू राजाच्या हवाली केला. नंतर घनगड किल्ला शाहू राजांकडून पेशव्यांकडे आला. उत्तर पेशवाईत घनगडाचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला जात होता, इथे मोठे राजकीय गुन्हेगारांसह सामाजिक गुन्हे करणारऱ्यांना कैदेत ठेवले जाई. १७७१ मध्ये आजोजिराव ढमाले हे घनगडचे किल्लेदार असताना राघोबादादा उर्फ रघुनाथ बाजीराव यांच्या पदरचा सखाराम हरी गुप्ते हा तडफदार सैन्य अधिकारी कैदेत होता. त्याचा मृत्यू ह्याच किल्ल्यावर झाला. दि. १७ मार्च १८१८ रोजी लेफ्टनंट कर्नल पँथरच्या सैन्याने घनगड पेशव्यांकडून काबीज केला. त्यावेळी घनगड राखण्यासाठी कोणतीही लढाई झाली नाही. पोहोचण्याच्या वाटा : किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे अणि ती एकोले या किल्ल्याच्या पायथ्याच्य गावातूनच वर जाते. एकोले गावात जाण्यासाठी मुंबई आणि पुण्याहून लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भांबुर्डेकडे जाणारी एस. टी पकडावी. लोणावळा ते भांबुर्डे हे अंतर ३२ कि.मी चे आहे. भांबुर्डे गावातून चालत १५ मिनिटात एकोले गावात पोहोचता येते. एकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. गावातील हनुमान मंदिराच्या विरुध्द बाजूस (रस्त्याच्या डाव्या बाजूला) गडावर जाणारी पायवाट आहे. ही वाट थेट किल्ल्यावर जाते. खाजगी वहानाने घनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्या एकोले गावात जाण्यासाठी प्रथम लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भूशी डॅम, आय.एन.एस.शिवाजी मार्गे ऍम्बी व्हॅलीच्या दिशेने जावे. लोणावळ्यापासून २० किमीवर असलेल्या पेठशहापूर गावातून (हे कोरीगडाच्या पायथ्याचे गाव आहे.) उजव्या बाजूचा फाटा भांबुर्डे गावाकडे जातो. येथून खडबडीत डांबरी रस्ता १२ किमीवरील भांबुर्डे गावात जातो. भांबुर्डे गावात मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूचा रस्ता पकडावा, हा रस्ता ३ किमीवरील एकोले गावात जातो. राहाण्याची सोय : किल्ल्यावर गुहेत ४-५ जणांची, गारजाई मंदिरात १० लोकांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. एकोले गावात आधी सांगितलं तर नाश्त्याची आणि जेवणाची सोय होते. पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याचे पाणी शिडी जवळील टाक्यात आहे.