У нас вы можете посмотреть бесплатно सिद्धगिरी जननी आयव्हीएफ सेंटर उद्घाटन सोहळा क्षणचित्रे - 5 फेब्रुवारी 2023 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’अशी ओळख निर्माण केली आहे. सध्या नवोदित जोडप्यांमध्ये मूल न होण्याच्या कारणांमध्ये वाढ झालेली दिसते आहे. बदलती जीवनशैली, आहार, वयाने उशिरा होणारी लग्ने ही त्यातील मुख्य कारणे आहेत. समाजाची हीच गरज ओळखून कर्नाटकच्या आमदार सौ. शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या योगदानातून व पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या आशिर्वादाने प्राचीन आयुर्वेद, अद्ययावत तंत्रज्ञान आणि कुशल डॉक्टरांच्या मदतीने सिद्धगिरी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर व सिद्धगिरी आरोग्यधाम येथे ‘सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ. सेंटर’ सुरु करण्यासाठी सर्व ती मदत करून पुढाकार घेवून पूर्णत्वास आणले आहे. या सेंटरचा लोकार्पण सोहळा पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन सानिध्यात मा. आण्णासाहेब जोल्ले खासदार, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ मा. ना. सौ. शशिकला जोल्ले धर्मादाय, हज आणि वक्फ मंत्री आमदार, निपाणी मतदारसंघ, कर्नाटक राज्य मा. सौ. यशोदा एस. वंटगोडी आयपीएस एस.पी. (लोकायुक्त) बेळगांव यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाची ही क्षणचित्रे. #siddhagiri #siddhagirimath #siddhagirihospital