У нас вы можете посмотреть бесплатно करुणाष्टक : अनुदिनि अनुतापें।राष्ट्रीय कीर्तनकार श्रीचारूदत्त आफळे।Karunashtak by Charudatta Aphale или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#अनुदिनअनुतापेंतापलोंरामराया #Anudinianutape #Karunashtak #Charudattaafle #Charudattaphale परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥ अचपळ मन माझें नावरे आवरीता । तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥ भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥ रघुपति मति माझी आपुलीशी करावी । सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥ विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं । तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥ रघुकुळटिळका रे हीत माझें करावें । दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥ ३ ॥ तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें । तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ॥ प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी । अचल भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥ चपळपण मनाचें मोडितां मोडवेना । सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥ घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥ ५ ॥ जळत ह्रदय माझें जन्म कोट्यानुकोटी । मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥ तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू । षड्रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥ ६ ॥ तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी । शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ॥ झडकरि झड घालीं धांव पंचानना रे । तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥ ७ ॥ सबळ जनक माझा राम लावण्यकोटी । म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ॥ दिवस गणित बोटीं ठेवूनि प्राण कंठीं । अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥ ८ ॥ जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे । पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे ॥ जळधरकण आशा लागली चातकासी । हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥ तुजविण मज तैंसे जाहलें देवराया । विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ॥ सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं । वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥ १० ॥ स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे । रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ॥ जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती । विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥ ११ ॥ सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे । जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें ॥ विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं । रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥ १२ ॥ सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकूनि आलें । भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चीत जाले ॥ भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना । परम कठिण देहीं देहबुद्धि वळेना ॥ १३ ॥ उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं । सकळभ्रमविरामीं राम विश्रामधामीं ॥ घडिघडि मन आतां रामरूपीं भरावें । रघुकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥ १४ ॥ जळचर जळवासी न्स्णती त्या जळासी । निशिदिन तुजपासीं चूकलों गूणरासी ॥ भुमिधरनिगमांसी वर्णवेना जयासी । सकळभुवनवासी भेट दे रामदासीं ॥ १५ ॥ ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥