У нас вы можете посмотреть бесплатно स्पर्शाची भूक प्रत्येकाला असते - Vaishali Haldankar | बारबाला Book | Woman ki Baat | Mugdha Godbole или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Aarpaar #आरपार #aarpaar #womankibaat #vaishalihaldankar मुंबईला मायानगरी का म्हणतात, ह्याला अनेक कारणं, उदाहरणं आहेत. त्या अनेकातलं एक नाव वैशाली हळदणकर... साधारणपणे स्त्रीचं आयुष्य खडतर असतं पण एवढं! वैशाली यांचा प्रवास बघताना, ऐकताना अंगावर काटा येतो. एखाद्याच्या आयुष्यात एवढं घडावं, असा प्रश्न पडतो. लहानपणापासून वडिलांचं प्रेम नाही मिळालेलं, समज येण्याआधीच आजूबाजूच्या पुरुषांकडून नको ते कृत्य, ज्या वयात आई जवळ असावी असं वाटतं तेव्हाच आई घर सोडून गेली... काय काय सहन केलंय या स्त्रीने. १९८० चं दशक आणि मुंबईचे डान्सबार भरभराटीला आले होते. कुटुंब नसलेल्या, पैसा नसलेल्या आणि संधी नसलेल्या तरुणींसाठी ते एक आधार बनले. वैशालीने स्टेज निवडलं नाही; स्टेजने तिला निवडलं. ती सुरुवातीला गायिका म्हणून आली होती पण तिचा आवाज बारच्या गोंधळात धडपडत होता. म्हणून त्यांनी काही काळासाठी नृत्यही सुरु केलं. त्या नर्तकी बनल्या, डान्सबार हे एक स्वतंत्र विश्व होतं. आरपारच्या 'वुमन की बात' मुलाखतीत त्यांनी समाजाच्या विकृत मानसिकतेबद्दल मत व्यक्त केलंय. कसा स्त्रियांचा फायदा घेतलो जातो, आणि बार मधल्या स्त्रियांचं आयुष्य कसं विदारक असतं याबद्दल बऱ्याच गोष्टी, घटना सांगितल्या. एक नाकारलेली मुलगी, जिला आयुष्यात नको नको ते बघावं लागलं, सहन करावं लागलं, असं ऐकलं की त्या स्त्रीचं सांत्वन करावंसं वाटतं, पण वैशाली या प्रचंड खंबीर आणि लढवय्या स्वभावाच्या आहेत. एवढं मात्र या पॉडकास्टमधून निदर्शनास आलं. त्यांनी स्वतःला नेहमीच एक कलाकार म्हणून जगवलं आणि वाढवलं आहे. नृत्य आणि गायन कुठं ही केलं तरी ती कलाच आहे असं त्या म्हणतात... आणि बारमध्ये कलेचा आदर करणारे लोकही येतात असं त्या म्हणतात. हा एपिसोड जरा त्रासदायक, किंवा असहाय्य करून टाकणारा नक्कीच वाटू शकतो. पण आरपार नेहमीच काही तरी नवीन आणि प्रेरणादायी विषय दर्शकांसाठी आणतो आणि हा सुद्धा त्यातलाच एक आहे. आरपार Woman Ki Baat चा हा नवा एपिसोड बघा आणि समाजातल्या कोणत्या घटकांमध्ये बदल हवा यावर नक्की विचार करा. 0:00 - परिचय 6:20 - लैंगिक अत्याचाराबद्दल सांगणार कुणाला! 8:40 - अख्खा समाजच एकमेकांपासून दुरावलेला आहे. 13:15 - माझ्या वडिलांना मी डोळ्यासमोर नको होते. 17:47 - घरात प्रेम नाही भेटलं की मुलं बाहेर जातात. 21:20 - वीस वर्षाची असेपर्यंत दोन मुलं झाली होती 24:10 - नवऱ्याचा माझ्यावर असलेला संशय. 27:39 - डान्स बार ची सुरुवात, बार मधील इतर मुली. 30:50 - दुसरा कुठला मार्गही नव्हता माझ्याकडे. 35:22 - pub culture मुळे डान्सबारच वातावरण बिघडलं 38:34 - बारमध्ये काम करणाऱ्यांना घाणेरड्या स्त्रिया म्हणतात! 42:38 - टेक्नॉलॉजीमुळे कलेची किंमत कमी झाली. 45:17 - माझी ओळख... 47:18 - 2009 नंतर बारच वातावरण बिघडत गेलं. 50:40 - मराठी मुली आणि डान्सबार! 53:20 - वर्षा काळेंनी माझा उपयोग करून घेतला. 1:04:10 - ओशोंकडे दीक्षा,आणि मुलांवरचे संस्कार. 1:06:20 - त्या काळात दारूचे व्यसन लागलं होतं. 1:8:03 - म्हणून मस्कदला गेले. 1:13:40 - स्त्रियांचे दुसरे लग्न कधीच टिकत नाही. 1:22:23 - कलाकारांचा मरण आधीपासूनच होतं. 1:27:14 - ओशोंचा आयुष्यावरचा प्रभाव 1:30:20 - व्यवस्थेकडून असलेल्या अपेक्षा. 1:39:28 - स्त्रियांनी जागृत व्हावा. आभार Woman Ki Baat Credits: Producer - Ashwini Teranikar. Host - Vinod Satav / Mugdha Godbole. Research - Nikhil Mane, Maithily Apte, Shivprasad Dhage. Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte. Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte. Camera - Sourabh Sasane & Team Video Editing - Sameer Sayyad. Reel Editing - Ankita Bhosale, Rupesh Jagtap. Other Assistance - Sulindar Mukhiya