У нас вы можете посмотреть бесплатно घरातच १२ फुट खोल समाधी | कोंडगावचे ग्रामजोशी | 120 Years Old Konkani House или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या आपल्या युट्यूब चॅनलच्या निमित्ताने कोकणात माझी कुठे कुठे भ्रमंती होणार आहे याची मला काही कल्पना नाही. पण मला ही भ्रमंती आवडते आहे. या व्हिडिओच्या निमित्ताने मी पोहचलो रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव साखरपा या गावी. तेथील ग्रामजोशी धर्माधिकारी श्री. रेमणे कुटुंबीयांनी माझे अगत्याने केलेले स्वागत मी नेहमी स्मरणात ठेवेन. या व्हिडिओआधी ना ओळख ना पाळख पण यापुढे मात्र साखरप्यातील हक्काच्या कुटुंबांमध्ये या कुटुंबाची भर पडली हे नक्की! या घराला भेट दिली म्हणून मला घरातच पुर्वजांची समाधी असलेले हे पहिलेच घर पाहता आले व आपणास दाखविता आले. संपूर्णतः बकुळीच्या लाकडाने बांधलेले हे १०० वर्षांहून अधिक काळ डौलाने उभे असलेले घर नक्कीच एक अप्रतिम कलाकृती आहे. या घरात असलेले धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरण विशेष आहे. एकाच घरात इतकी माणसे असणारी राहत्या घरातील एकत्र कुटुंब नक्कीच खास आहे. तुम्हाला हे जुने घर व प्रेमळ रेमणे कुटूंब कसे वाटले हे प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा. आपण हा चॅनल सबस्क्राइब करून मला नक्की सहकार्य करा. आपण व्हिडिओ लाईक, हाईप व शेअर केल्याने मला प्रोत्साहन मिळते. सदरील सर्व गोष्टी निःशुल्क असून मला आपण यातूनच सहकार्य करू शकता. असेच खास व्हिडिओ मी नेहमी या चॅनलद्वारे शेअर करत राहीन याची ग्वाही देतो! #ratnagiri #marathi #kokan #konkan #kokani #konkani #maharashtra #rajapur #lanja #malvan #chiplun #sangameshwar #atharvahardikar #sakharpa #साखरपा #महाराष्ट्र #मराठी #कोकणी #कोकण #राजापूर #लांजा #रत्नागिरी #कुडाळ #मालवण