У нас вы можете посмотреть бесплатно Unwanted Marriage | भाग ६ | marathi stories| marathi audio Story| मराठी प्रेमकथा |कथाकथन или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सकाळ सकाळ घरात कुकरच्या शिट्या, मिक्सर चा आवाज,भांड्याचा खळखळाट,इतके सगळे विचित्र आवाज ऐकून एकदाची आपली शिवानी उठली. "बाबा काय गरज आहे इतकं सगळ करायची.ते लोक फक्तं पाहायला येणार आहेत.दोन टाइम नाष्टा आणि चार टाइम जेवण करून नाही जाणार."किचन मध्ये झालेला तो पसारा पाहून तिने जरा वैतागुन सीमा आणि आपल्या बाबांकडे पाहिलं. "माझ्या मुलीला पाहायला येणार आहेत.या गरीब बापाकडे खूप काही नसलं तरी मोठं मन आहे हे कळू दे की,लग्न जमेल की नाही हा पुढचा प्रश्न पण माझ्या मुलीला कोणी नाव ठेऊन गेलेलं मला आवडणार नाही. पाटलांच्या घरात पाहुण्यांना देवाचा दर्जा देत आलेत. यापुढे ही तेच राहील.तू जा जाऊन तयारीला लाग."दिलीप यांनी मस्त दही वड्याला फोडणी घातली आणि शिवानी ला बाहेर जायचा इशारा केला. "बाबा सकाळचे सात वाजले आहेत.इतक्या लवकर आवरायला मला काही आजच लग्न नाही करायचं. तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला मी माझ्या वेळेतच तयार होणार.सीमा जरा कॉफी बनवून दे ना प्लीज."शिवानी ने सरळ आपल्या बाबांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बाहेर निघुन गेली. "हॅलो.."अगदी हळू आवाजात तिने बोलायला सुरुवात केली. समोरून जे काही कानावर पडत होत त्यामुळे तर कपाळावर घाम जमा झाला होता. "अहो मी करते ना काहीतरी,बाबांना काही सांगायची गरज नाही.हात जोडते त्यांना यातलं काही कळू देऊ नका.प्लीज मला थोडा वेळ द्या.मी येते ना.हो नक्की येईल भेटायला."शिवानी ने घाईतच बोलून फोन ठेवला. "शिवानी sss."अचानक जवळून आवाज आला तशी ती अजूनच घाबरली. दचकून मागे वळून पाहिलं तर समोर प्रसन्न चेहऱ्याने तिचे बाबा हातात कॉफी घेऊन उभे होते.तिने बळेच चेहऱ्यावर हसू आणत त्यांच्याकडे पाहिलं.त्यांनी तिथेच बसत तिच्या हातात कॉफी चा मग दिला.तिने लगेच नजर फिरवून स्वःताला नॉर्मल केलं आणि पुन्हा त्यांच्याकडे हसून पाहिलं. "माझ्यासाठी शांत राहशील? एका बापाला मुलीच्या लग्नाची खूप चिंता असते.ती चांगल्या घरात, चांगल्या माणसांत जावी हीच इच्छा असते.तुझं चांगल झालं की माझं सगळं टेंशन दूर होईल.माणस बोलण्यावरून चांगली वाटली. त्यांच्यासमोर या बापाला मान खाली घालावी लागेल अस काही करू नको."शिवानी चे बाबा तिचा हात हातात घेऊन बोलतात.बोलताना कंठ दाटून आला होता.आई गेल्यावर त्यांनी बाप आणि आई दोघांची भूमिका उत्तम रित्या पार पाडायचा प्रयत्न केला होता. "बाबा मी चुकीचं अस काही वागणार नाही.पण माझा होकार असेल तरच हे लग्न होणार हे पण डोक्यात असू द्या."शिवानी ने पुन्हा त्यांना आठवण करून दिली.थोड्यावेळ पुन्हा त्यांनी तिला समजून सांगून आत निघून गेले. "बाबा कितीही काही झाल तरी मी हे लग्न नाही करू शकत. तिकडे कितीही मोठा महाल असला तरी मला आपल्या या झोपडीत सुख मिळत."शिवानी आपल्या बाबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बोलते. अकरा च्या सुमारास जाधव मंडळी घराबाहेर पडली. इरावती तर आज अगदी आनंदात होत्या.कधी एकदा आपल्या मुलाचे दोनाचे चार हात होतात आणि सगळ्या त्याला चीपकणाऱ्या त्या भवान्या त्याच्या आयुष्यातून कायमच्या निघून जातील म्हणून मनातच आनंद झाला होता. आजी तर आपल्या रुबाबात गाडीत जाऊन बसल्या. आज दिनेश गाडी चालवत होता.आईसाहेब आणि इरावती एकाच गाडीतून येणार होत्या तर रूहान दिनेश सोबत आपल्या गाडीतून निघाला. डोळ्यावर गॉगल चढवून तो कोल्हापूर च निरीक्षण करत प्रवास करत होता.मध्ये मध्ये फोन कॉल्स चालू होते.उद्या काही करून पुन्हा मुंबई गाठायची होती. वडिलोपार्जित कापड कारखाने असले तरी त्याचा स्वःताचा असा ज्वेलरी डिझायनिंग चा व्यवसाय होता. करोडो रुपयांची रोजची उलाढाल होती.अस कोल्हापूर मध्ये राहून त्याला सगळ हॅण्डल करण कठीण जात होतं त्यात त्याच्या त्या शेकडो गर्लफ्रेंड त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसल्या होत्या.आज काही करून हे लग्नाचं मॅटर क्लोज करायचं आणि मुंबई गाठायची अशी सगळी प्लॅनिंग त्याने करून ठेवली होती. "ताई काय गोड दिसत आहे.माझीच नजर लागेल.आज मुलाचं काही खर नाही.ताई आज लग्न जमणार हे नक्की.मला ना स्ट्राँग फिलिंग येत आहे की या घरात तुमच लग्न जुळणार."सीमा तयार झालेल्या शिवानी ला पाहून बोलते. तशी शिवानी ने आपल्या हातातली साडी पिन रागातच तीच्याकडे फेकून मारली. जाधवांच्या गाड्या पाटलांच्या घरासमोर येऊन थांबल्या. आजुबाजुला लहान मोठी घर होती.त्यांच्या गाड्या थांबल्या तसे आजूबाजूचे डोळे मोठे करून पाहू लागले. आईसाहेब आपल्या अंगावरची शाल नीट करत उतरल्या.इरावती ही साडी सावरत बाजूचा परिसर पाहत उतरली.त्यांच्या मनाने तो परिसर थोडा गचाळ वाटला , समोर दिसणार घर ही लहान होत. एक दोन मजली लहान घर होत,छोट अंगण दिसत होत.जुन्या असलेल्या गेट ला हाताने बाजूला सारून त्यांचा माणूस आत आला. आईसाहेब आणि इरावती लगेच आत आल्या.समोर दिलीप हात जोडून त्यांचं स्वागत करायला उभे होते.आईसाहेब हलकं स्मित करून त्यांना पाहतात.इरावती ही हात जोडून हसुन पाहतात. "डिस्कस्टिंग.."तो परिसर पाहूनच रूहान ने नाक मुरडले.त्याला तो भाग तितकासा आवडला नाही म्हणून चिडचिड सुरू झाली.कुठे फाईव स्टार हॉटेल मध्ये बसून चहा पिणारा आज या ठिकाणी मुलगी पाहायला आला होता.वैतागला लगेच.आजुबाजुला त्याला एकटक पाहणाऱ्या नजरा दिसल्या. आपापसात कुजबुज चालू होती.त्याने सरळ त्यांना इग्नोर करत आपला सूट ठीक करत झपझप पाऊल टाकत आत निघाला.दिलीप यांनी सगळ्यांना आत यायला खुनावल. घरात येऊन दहा मिनिट झाले असतील की त्या आवाज करत फिरणाऱ्या फॅन कडे पाहून रूहान ने आपल्या शर्ट ची वरची दोन बटन खोलली. #मराठी #lovestory #हृदयस्पर्शीकथा #love #marathilovestory #motivation #emotional #marathi #hatelove #हृदयस्पर्शीकथा #emotional #viralvideo #मराठी #lovestory #love #marathilovestory #मोटिवेशन #marathipodcast #marathilovestory #हृदयस्पर्शी