У нас вы можете посмотреть бесплатно सरलष्कर दरेकर गढी आंबळे पुरंदर | Historical Darekar Gadhi Ambale Purandar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सरलष्कर दरेकर गढी आंबळे पुरंदर | Historical Darekar Gadhi Ambale Purandar पेशवाईत घोडदळाचे सेनापती खंडेराव दरेकर यांचे वतन असलेले भरभराटीस आलेले हे आंबळे गाव आजही त्याच्या अंगाखांद्यावर गतकाळाच्या वैभवशाली खुणा बाळगुन आहे.आंबळे गावात पाहायला मिळाली सरलष्कर दरेकर यांची गढी. गढी सासवड पासून १६ किमी अंतरावरआहे. मुळात आंबळे गाव एका कोटात वसलेले असुन कधी काळी या संपुर्ण गावाला तटबंदी व बुरुज असल्याच्या खुणा जागोजाग दिसुन येतात. आंबळे गावात फेरी मारताना आजही पडीक अवस्थेत असलेले हे वाडे मोठया प्रमाणात दिसुन येतात. गावात प्रवेश करणारा रस्ता या कोटाच्या उध्वस्त दरवाजातुनच आत शिरतो बारकाईने पाहिल्यास आजही या कोटाच्या दरवाजाची कमान व त्या शेजारील दोन ढासळलेले बुरुज आजही पहायला मिळतात. गावात शिरल्यावर नगरकोटाच्या तटबंदीच्या आतच सेनापती खंडेराव दरेकर यांचा वाडा आहे. वाड्याचा मुख्य दरवाजा दिल्ली दरवाजा म्हणुन ओळखला जातो. वाडयाच्या या दरवाजाशेजारी दोन बुरुज असुन समोरील बाजुस नगारखाना व दुसरा वाडा आहे. गढीचा परीसर साधारण तीन एकरचा असुन गढीचे बुरुज व तटबंदी आजही मोठया प्रमाणात शिल्लक आहेत. दरेकर हे मोरे या ९६ कुळाचे उपकुळ आहे. मुळ सातारा येथील जावळी भागातील दारे गावचे ते दरेकर किंवा दऱ्याखोऱ्यातील वीर ते दरेकर म्हणुन ओळखले जातात. शिवकाळात हिरोजी, गणोजी हे पायदळाचे असामी म्हणून मराठा सैन्यात होते त्यांचे वारस सुभानजी, गोरखोजी, मानाजी, गौरोजी यांना अनेक गावचे मोकासे होते. मराठयांमधील मोठ्या इनामदारांमध्ये दरेकर अग्रणी होते. यांचा पराक्रम उभारून आला तो पेशवेकाळात. आंबळे हे गाव छत्रपती शाहुराजे यांनी सुभानजी दरेकर यांना लष्कर खर्चासाठी इनाम दिले. यांचे वंशात खंडेराव दरेकर सरलष्कर झाले. त्यांनी माधवराव पेशवेंचा पिसाळलेल्या हत्तीपासून जीव वाचवला. पेशवे काळात पानिपत, खर्डा, उदगीर, राक्षसभुवन, कर्नाटक, खानदेश येथे झालेल्या मराठ्यांच्या लढायात प्रमुख सरदारा मध्ये दरेकर यांचा समावेश होतो. शनिवार वाड्याजवळ आजही दरेकरांचा वाडा आहे. इ.स.१७९४ मध्ये दसऱ्याच्या सीमोल्लंघना वरून परत आल्यावर शनिवार वाड्यातल्या दरबार महालात पेशव्यांनी रुपये ८२७ एवढ्या किंमतीची मानाची वस्त्रे हणमंतराव दरेकर यांना दिल्याची नोंद आढळते... दरेकर गढीचा इतिहास आणि आजची स्थिती सांगणारा एक बोर्ड पाहायला मिळतो. अतिशय सार्थ शब्दात मांडलेली गढीची व्यथा त्यात समजते. खर आहे, पुरंदरच्या पुण्यभूमीत दगडादगडात इतिहास सामावलेला आहे. पण आजच्या धकाधकीच्या या जीवनात आपल्याकडे एवढा तिने कुठंय तो पाहायला, तो वाचायला? म्हणूनच हा रोमंचक इतिहास आपणासमोर या चॅनेलच्या माध्यमातून पोचवण्याचा आमचा प्रयत्न. आमचा प्रयत्न कसा वाटला ते कॉमेन्टच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. शेर सब्स्क्रिब करायला विसरू नका आपले मराठी मॅटर #darekar #purandar #ambale