У нас вы можете посмотреть бесплатно Jeevanvidya's Guidance to Students - Part 1 | Vidyarthyana Margadarshan | Satguru Shri Wamanrao Pai или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रस्तुत प्रवचनात सद्गुरु श्री. वामनराव पै यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थी नियमित शाळेत जातात; परंतु कित्येक विद्यार्थी फक्त आई-वडिलांनी पाठविले म्हणून अथवा त्यांच्या धाकाने शाळेत जातात. हे पूर्णपणे चुकीचे असून शाळेत आपण ज्ञान व शिक्षण घेण्यासाठी जातो, हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे. हे ज्ञान घेऊन विद्यार्थ्याने स्वतःचा, कुटुंबाचा व पर्यायाने राष्ट्राचा उत्कर्ष साधणे अभिप्रेत आहे. सद्गुरु श्री. वामनराव पै सांगतात, “ज्ञान हाच देव”. म्हणून ज्ञानाची उपासना जेथे केली जाते त्या शाळेला ‘ज्ञानमंदिर’ अथवा ‘विद्यामंदिर’ असे संबोधतात. ज्ञानरूपी देवाची उपासना करण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे. हा अभ्यास का करावा, कसा करावा, किती वेळ करावा याचेही मार्गदर्शन सद्गुरु श्री.वामनराव पै करतात. फक्त पुस्तक समोर ठेवले आणि वाचले म्हणजे अभ्यास झाला असे नव्हे; तर हे वाचन काळजीपूर्वक व बारकाईने झाले पाहिजे. ‘अभ्यास कसा करावा’ हे सांगताना सद्गुरु श्री वामनराव पै अभ्यासाची त्रिसूत्री सांगतात, ते म्हणजे काळजीपूर्वक बारकाईने पुन्हा पुन्हा वाचणे, वाचलेले स्मरणात ठेवणे व स्मरणात ठेवलेले लिहून काढणे. आपण किती वाचले व स्मरणात किती ठेवले याहीपेक्षा आपण ते कागदावर लिहिणे महत्त्वाचे आहे. कारण Writing makes man perfect. हे वाचन किती वेळा करायचे म्हणजे स्मरणात चटकन राहील, हे सांगताना सद्गुरु एक गोष्ट देखील सांगतात॰ काहींना लक्षात ठेवण्यासाठी अर्धा तास लागतो तर काहींना दोन तास. आपल्यातली क्षमता स्वत:च जाणून घेऊन अभ्यास किती वेळ करायचा हे आपण ठरवावे. त्यासोबतच सद्गुरु श्री. वामनराव पै अभ्यासाच्या विविध पद्धती येथे उलगडून सांगतात. कोणताही अभ्यास करताना आपल्याला सर्वप्रथम अभ्यासाची गोडी लागणे आवश्यक आहे. ही गोडी लागल्यावर आपल्याला अभ्यास हवाहवासा वाटतो, अधिक करावासा वाटतो. आणि म्हणून फक्त परीक्षेपुरता अभ्यास न करता ज्ञान मिळविण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी परीक्षा जवळ आल्यावर देवळात जाऊन नमस्कार करणे, देवाला नवस बोलणे असे प्रकार करताना दिसतात परंतु हे करण्यापेक्षा आपण प्रयत्न व अधिक अभ्यास केल्यावरच परीक्षेत चांगले यश मिळते. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी आई-वडील व शिक्षकांचा आदर करणे देखील महत्त्वाचे आहे. शिक्षण घेताना मुलांना योग्य संगत मिळणे व शरीराची काळजी व जोपासना करणे आवश्यक आहे. व यासाठी आई-वडिलांनी मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे. योग्य मार्गदर्शन, उत्तम शरीरप्रकृती, सुसंगती यासोबतच आपण विचारांवर देखील लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आपण जसे विचार करू त्याप्रमाणे आपले अंतर्मन प्रतिसाद देत असते. म्हणून मुलांच्या प्रगतीबद्दल किंवा मुलांनी केलेल्या अभ्यासाबद्दल नकारात्मक न बोलता सतत आपण त्यांना सकारात्मक विचार दिले पाहिजेत. अशाप्रकारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत यश कसे मिळवावे याबाबत सद्गुरू श्री. वामनराव पै मार्गदर्शन करतात. ********* सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत. For more information visit: http://www.jeevanvidya.org/ Subscribe our channel at https://www.youtube.com/JeevanvidyaMi... Like us on Facebook: / jeevanvidya Follow us on: / jeevanvidya Follow us on Google: https://plus.google.com/+JeevanvidyaO... Find us on: http://www.jeevanvidya.org/ #विद्यार्थ्यांना_मार्गदर्शन_जीवनविद्येचे #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai