У нас вы можете посмотреть бесплатно उपासनासंगीत गीत क्र.311॥ अनुभूति भक्ती स्वर्गाचेच दार॥ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सर्व भक्तजनांस प्रभु येशुच्या नामात सहर्ष अभिवादन ! ‘उपासना संगीतातील’ भक्तिगीतांच्या चाली अवगत होऊन, उपासकांना ही गीते तालासुरात सहजपणे गाता यावीत; या हेतुनं निरनिराळ्या गानवृंदाच्या समुहस्वरात ती ऐकविण्याचा उपक्रम उपासना गीत- गायन अभियान राबवित आहे. आपल्याही गानवृंदाला ही रेकॉर्ड करण्यासाठी आमंत्रण आहे. त्यासाठी अवश्य आमच्याशी संपर्क साधा. पित्याच्या मांडीवर खेळणाऱ्या बालकाच्या, जणू लड़ीवाळअनुभवाची प्रचीती प्रार्थनेत घेत, स्वर्गीय सुखाची अनुभूती आपल्या काव्यातून सांगताना कविवर्य नारायण वामन टिळक म्हणतात "अनुभूति भक्ती स्वर्गाचेच दार, परम सुंदर प्रार्थना हे ..." उपासनासंगीत क्र.३११ वरील हा अभंग ऐकवितआहोत... प्रभुगुणगान कलामंच पुणे येथील संगीतप्रेमी हौशी गानवृंदाच्या आवाजात ! गीत ऐकल्यानंतर LIKE आणि SUBSCRIBE करून प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका. आणि आपल्या गानवृंदाच्या रेकॉर्डिंग साठी या नंबरवर फोन करा: 9822639917 / 95525 96778 """"""""""""""""""""""""""""""""""""""""" उपासनासंगीत गीत क्र. ३११. प्रार्थना अनुभूति भक्ती स्वर्गाचेच दार, । परम सुंदर प्रार्थना हे ।। ध्रु० ।। अहा प्रार्थना हे पवित्र मंदिर, । येथे परात्पर भक्तांसवे. ।।१।। स्वर्ग पृथ्वीमध्ये उभारीला जीना, । तयाचे प्रार्थना नाम साजे. ।।२।। प्रार्थना पित्याची मांडीच केवळ ! । चढे वर बाळ लडीवाळे. ।।३।। प्रेमाचा वर्षाव, आत्म्याचा प्रकाश, । आसवे सहास प्रार्थना हे. ।।४।। ख्रिस्तशिष्य म्हणे, ख्रिस्तासंगे जाणे, । देवा आलिंगणे प्रार्थना हे ! ।।५।। #christian marathi songs #chdisgianmusic रेव्ह. नारायण वामन टिळक (६ डिसेंबर १८६१ - ९ मे १९१९) #marathichristiansongs #christianmarathisongs #marathigane #upasanasangit #christiansongs #devachigani #upasanasangitsongs ,#devaxhiganemarathi