У нас вы можете посмотреть бесплатно भाषाप्रभू ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे (श्री क्षेत्र भंडारा डोंगर) यांचे लेटेस्ट श्रवणीय कीर्तन или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कार्यक्रम निमित्त : कै. तुकाराम विष्णु भोर यांचे प्रथम पुण्यस्मरण (भावपूर्ण आदरांजली!) भाषाप्रभू ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे (श्री क्षेत्र भंडारा डोंगर) यांचे सुश्राव्य कीर्तन | भव्य मोफत रोग निदान शिबीर आपले नम्र : समस्त ग्रामस्थ भोरवाडी व अवसरी खुर्द अभंग निरुपण थोडक्यात : "पापाची वासना नको दावू डोळा। त्याहुनि आंधळा बराच मी ।।१।। निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधीर करोनी ठेवी देवा ।। २ ।। अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याहूनी मुका बराच मी ।।३।। नको मज कधी परस्त्री संगती । जनातून माती उठता भली ।।४।। तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा । तू एक गोपाळां मज आवडसी ।। ५।। ------------------------------------------ संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून आपल्या इंद्रीयांना खूप मोलाचा सल्ला दिला आहे. हे देवा, माझी दृष्टी निर्मळ ठेव. माझ्या डोळ्यांना वाईट गोष्टी पाहू देवू नको. त्यापेक्षा आंधळेपण बरे , कोणाची निंदा ऐकण्यापेक्षा तू मला बहिरा ठेव. माझ्या मुखातून कधीही अपवित्र वाणी बाहेर पडू देवू नको, त्यापेक्षा मी मुका झालेला बरा. मला कधीही परस्त्री ची संगत करण्याची पाळी येवू देऊ नको; एक वेळ मी मरण पत्करेन पण परस्त्रीसंग करणार नाही. हे देवा मला या साऱ्या वाईट गोष्टीचा कंटाळा आलेला आहे, एक तू मात्र तू मला सदैव आवडतोस. मला तुझी भक्ती प्रिय आहे. तुझीच भक्ती करण्याची मला सद्बुद्धी दे. ”पापकर्म, दृष्टकृत्य, परस्त्रीसंग, अभद्रवाणी, परनिंदा या गोष्टी मनुष्याला अधोगतीकडे घेवुन जाणार्या आहेत. मनुष्याने आपले मन स्वच्छ , निर्मळ, प्रसन्न, आनंदी, व देवाच्या भक्तीत ठेवण्याचा सदोदित प्रयत्न केला पाहिजे, असे जगत् गुरू संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगाद्वारे आवर्जून सांगतात. 🙏*राम कृष्ण हरी*🙏