У нас вы можете посмотреть бесплатно लातूर जिल्ह्यातील खंडापूर येथे 400 एकरमध्ये भव्य अखंड हरिनाम सप्ताह | संपूर्ण आयोजन माहिती 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
लातूर जिल्ह्यातील खंडापूर एमआयडीसी येथे तब्बल 400 एकर परिसरात महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असा भव्य अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 22 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. श्री भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज, कैवल्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जन्मशताब्दीचा योग साधून हा ऐतिहासिक सप्ताह संपन्न होत आहे. हा सप्ताह संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी देवाची व जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या संयुक्त विद्यमाने, ह.भ.प. माऊली महाराज कदम (आळंदी देवाची) यांच्या पुढाकारातून आयोजित केला जात आहे. 🔹 विशेष आकर्षण: आळंदी व देहू येथून संतांच्या पादुका हेलिकॉप्टरद्वारे लातूर येथे आगमन. पादुका स्वागतासाठी – 750 पताकाधारी 750 महिला तुळस डोक्यावर 750 विनेकरी 750 चोपदार 750 मृदंग 750 टाळकरी 750 नामदेव नावाचे भाविक 750 तुकाराम नावाचे भाविक 750 ज्ञानेश्वर नावाचे भाविक 350 जनाबाई नावाच्या महिला 450 नारायण नावाचे व्यक्ती 🔹 सप्ताहातील कार्यक्रम: दररोज नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन गाथा, भजन, ज्ञानेश्वरी पारायण वाचन शेकडो विना व मृदंगांचा सामूहिक गजर 🔹 भोजन व्यवस्था: दररोज सुमारे 1 ते 1.5 लाख भाविकांसाठी महाप्रसाद. लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा वार ठरवून प्रत्येक घरातून भाकरी देण्याचे नियोजन. महाराष्ट्रातील विविध भागातील चवींची दररोज वेगळी आमटी. समारोपदिनी 7 ते 8 लाख भाविकांसाठी पुरणपोळी महाप्रसाद. सप्त्यामधील उर्वरित निधी देहू संस्थानमार्फत भंडारा डोंगर येथील बांधकामासाठी देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. उदगीर, देवणी व जळकोट तालुक्यांची बैठक घेऊन या सप्ताहाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 🙏 अधिक अपडेटसाठी चॅनल Subscribe करा. #अखंडहरिनामसप्ताह #Khandapur #LaturNews #SantGyaneshwar #SantTukaram #SantNamdev #Alandi #Dehu #Warkari #Maharashtra #BhaktiSohala #Harinam #DevotionalEvent #LaturDistrict #latur #maharashtratopnews #latur #maharashtratopnews #marathinews #लातूर #news #maharashtranews #ausa #latestnews #sidheshwar