У нас вы можете посмотреть бесплатно Gaza, Lebanon आणि Iran, ३ वर्षात Netanyahu यांनी अख्खे शत्रू कसे संपवले? | Story Dot Com или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#benjaminnetanyahu #israelhamaswar #israelnews #iranisraelwar #storydotcom दिवस होता ७ ऑक्टोबर २०२३… आपल्या जैसलमेरमधल्या वाळवंटात जशा संगित कार्यक्रमाच्या मैफल बसतात तशी मैफल इस्रायल आणि गाझा यांच्या सीमेजवळ असलेल्या किबुत्झिम या शहरातल्या नोवा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये बसलेली होती.. शनिवारचा आणि सुट्टीचा दिवस होता, फारसे सैनिक पहारा देण्यासाठी हजर नव्हते, तरुण मंडळी रात्रभर संगित कार्यक्रमाचा आनंद घेऊन थकलेली होती आणि अचानक दीड किमीवर असलेल्या गाझा पट्टीतल्या सीमेवरुन हमासच्या दहशतवाद्यांनी शहरात घुसून अक्षरशः नागरिकांची कत्तल केली. जवळपास अडीच ते तीन हजार हमासचे दहशतवादी वेगवेगळ्या २० ठिकाणांहून दुचाकी, ट्रक, मेडिटिरियन समुद्रातून बोटीद्वारे घुसले आणि इस्रायलच्या इतिहासातली सर्वात मोठी रेड सुरु झाली. या दहशतवाद्यांना लहान मुलं, महिला, वृद्ध अशा जवळपास १२०० जणांची हत्या केली आणि २५१ जणांना घेऊन दहशतवादी गाझामध्ये परतले. दुसऱ्या महायुद्धानंतर एका दिवसात झालेली इस्रायलच्या नागरिकांची ही सर्वात मोठी हत्या होती. याच दिवशी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी जाहिर केलं की हमासविरोधात ऑल आऊट वॉर आपण सुरु केलंय आणि हमासला पूर्णपणे संपवल्याशिवाय हे युद्ध संपणार नाही. हमासने सोबत नेलेल्या अडीचशे नागरिकांची सुटका करण्याचं तर आव्हान होतंच, पण ज्या १२०० नागरिकांचा जीव गेला होता, त्यांचाही बदला नेतान्याहूंना घ्यायचा होता.. नेतान्याहूंनी सुरु केलेल्या या युद्धात हमासच्या ७१ हजार सैनिकांचा अक्षरशः खात्मा करण्यात आला, गाझाची वीज, अन्न पुरवठा, पाणी, रुग्णालयात जाणारी औषधं सगळं तोडण्यात आलं आणि नेतान्याहूंनी एका अशा युद्धाची सुरुवात केली ज्यावर अमेरिकेसह युरोपातूनही टीका होऊ लागली. पण या दिवशी सुरु झालेलं युद्ध पुढचे काही वर्ष चालणार होतं, ज्यात इराणच्या सुप्रीम लीडरचाही खात्मा होईल असा विचारही कुणी तेव्हा केला नव्हता.. इस्रायलने आधी हमास, नंतर हमासला साथ देणारी शेजारच्याच लेबनॉनमधली हिजबुल्ला ही संघटना, नंतर हिजबुल्लाला साथ देणारी यमनची हौथी आणि शेवटी या सगळ्यांचा बाप असलेल्या इराणचा काटा कसा काढलाय त्याची ७ ऑक्टोबरपासूनची स्टोरी मी या व्हिडीओत सांगणार आहे… Join this channel to get access to perks: / @storydotcomofficial Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook - / officialstorydotcom Instagram - / officialstorydotcom X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...