У нас вы можете посмотреть бесплатно Dhule jilha Vudhansabha election 2024 | धुळे जिल्हा विधानसभा निवडणूक 2024 आढावा Satta news सत्ता или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#sattanews #सत्ता #dhule #धुळे #vidhansabha #विधानसभा 2024 धुळे जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात साक्री, धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा ,शिरापूर अशी मतदार संघाची नावे आहेत . यातील सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे साक्री हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. साक्री विधानसभा मतदारसंघ क्रमांक ५ आहे. साक्री मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचा समावेश होतो. साक्री हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे. अपक्ष उमेदवार मंजुळा गावित ह्या साक्री विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. 2019 मध्ये भाजपचे मोहन सूर्यवंशी यांच्या विरुद्ध अपक्ष मुंजळा गावित अशी लढत झाली होती. यामध्ये अपक्ष मुंजळा गावित यांनी 76,166 एवढी मते मिळवली तर भाजपचे मोहन सूर्यवंशी यांना 68 हजार 901 एवढी मते मिळाली. त्यामुळे 2009 मध्ये अपक्ष मंजुळा गावित यांनी बाजी मारली. साखरी या विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहायचा झाला तर साक्री मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे डॉ डी एस अहीरे यांनी सर्व प्रथम धुळे लोकसभेसाठी उमेदवारी करीत विजय मिळवला होता. त्यानंतर हा विधानसभा मतदार संघ अनुसुचित जमातीसाठी आरक्षित झाल्यानंतर काँग्रेसने पुन्हा त्यांना 2004 मधे विधानसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत काँग्रेसच्या हातातुन गेलेला हा मतदार संघ पुन्हा काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतला. यानंतर पुन्हा 2014 मध्ये पक्षाने अहीरे यांना संधी दिल्यानंतर ते पुन्हा विजयी झाले होते. आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक मध्ये मंजुळा गावित या अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार की एखाद्या पक्षामध्ये जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसेच येथे महायुतीकडून पुन्हा एकदा भाजपचे मोहन सूर्यवंशी यांना उमेदवारीची संधी भेटणार का हे पहा ना महत्त्वाचे ठरणार आहे तसेच महाविकास आघाडी कडून आता कोणाला तिकीट भेटेल हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता पाहूया दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे धुळे ग्रामीण हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ क्रमांक ६ आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील लामकानी, सोनगीर, फागणे, मुकटी, धुळे, कुसुंबे, आर्वी आणि शिरुर ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. धुळे ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कुणाल रोहिदास पाटील हे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. धुळे ग्रामीण मतदार संघ काँग्रेस पक्षाचा बा2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे काशिराम वेचन पावरा 1,20,403 मते मिळवून विजयी झाले. अपक्ष पक्षाचे डॉ. जितेंद्र युवराज ठाकूर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली परंतु, विधानसभा निवडणूक 2009 मध्ये मतदार संघाची पुर्नरचना झाल्यानंतर पहिल्यांदाच या मतदारसंघात शिवसेना पक्षाने विजय मिळवला होता. विधानसभा निवडणूक 2014 साली काँग्रेस पक्षाचे आमदार कुणाल पाटील यांनी भाजपचे मनोहर भदाणे यांना पराभूत करुन पुन्हा या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने त्यांचा झेंडा फडकावला आहे. 2019 मध्ये धुळे ग्रामीण येथे काँग्रेस पक्षाचे कुणाल रोहिदास पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे ज्ञानज्योती मनोहर पाटील अशी लढत झाली होती. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे कुणाल रोहिदास पाटील 1,25,575 मते मिळवून विजयी झाले. भाजपा पक्षाचे ज्ञानज्योती मनोहर पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. धुळे ग्रामीण येथे काँग्रेसचे कुणाल पाटील हे सलग दोन टर्म येथे आमदार राहिलेले आहेत. आता काँग्रेसचे कुणाल पाटील यांना तिसरा टर्मलाही आमदार होण्याची संधी धुळे ग्रामीण देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर भाजपच्या ज्ञानज्योती पाटील यांचा 2019 मध्ये जो पराभव झाला होता त्याचा त्या येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये वचपा काढणार का हेही पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये धुळे येथे काँग्रेसने बाजी मारले आहे. त्यामुळे धुळे येथे अजूनही महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही.