У нас вы можете посмотреть бесплатно स्मृतीस्थळ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
स्मृतिस्थळ 'स्मृतिस्थळ' हा चरित्रग्रंथमालेतील अखेरचा ग्रंथ आहे. 'वृद्धाचार' व 'मार्गरूढी' हे चरित्रग्रंथ नसून ती चरित्रात्मक स्फूट प्रकरणे आहेत. महानुभाव मतानुसार 'स्मृती' या शब्दाला विशेष अर्थ असून श्रीनागदेवाचार्यांनी श्रीचक्रधरस्वामींच्या वाणीतून निघालेली वचने ऐकून इतरांना जे स्मरणपूर्वक सांगितले ती 'स्मृती' आणि स्थळ म्हणजे ज्यात विवेचन केले जाते ते, अर्थात ग्रंथ यावरून 'स्मृतिस्थळ' म्हणजे श्रीनागदेवाचार्यांच्या स्मृतींचा, अर्थात त्यांनी श्रीचक्रधरांची वचने ऐकून सांगितलेल्या आचारधर्माचा ग्रंथ. या चरित्रात श्रीनागदेवाचार्यांकडे आचार्यपद आल्यापासून पुढील कालखंडाचा समावेश आहे. इसवी सन १३१२ मध्ये हा ग्रंथ रचण्यात आला. स्मृतिस्थळ' हे श्रीनागदेवांचे चरित्र असले तरी त्यांच्या समकालीन अत्यंत महत्त्वाच्या अशा थोर व्यक्तींवर आणि त्यांनी लिहिलेल्या साहित्यावरही प्रकाश पडणारे चरित्र आहे. नरेंद्र महकावी, भास्करभट्ट बोरीकर, केसोबास, दामोदर पंडित, महदाइसा इत्यादी साहित्यिक या स्मृतिस्थळात भेटतात. स्मृतिस्थळाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की "श्री नागदेवापासून ते त्यांच्याकडे अनुसरलेल्या सामान्यतील सामान्य महात्म्याचे चरित्र त्यांचे आचार, त्यांची तत्त्वज्ञानपर चर्चा, त्यावेळची राज्यव्यवस्था, राजकीय धुमश्चक्री, सामाजिक परिस्थिती, त्या काळची संस्कृती या गोष्टींचे दर्शन या ग्रंथातून होते. महानुभाव चरित्रग्रंथाची सर्व वैशिष्ट्ये स्मृतिस्थळास लागू पडतात. स्मृतिस्थळ वाचून श्रीनागदेवाचार्य म्हणजेच भटोबास हे कोणत्या योग्यतेचे पुरुष होते व त्यांच्या कर्तृत्वाची उंची काय होती याची चांगली कल्पना येते. त्यातील प्रत्येक स्मृतीतून त्यांची मूर्ती साकार होत जाते. शेवटी 'स्वामीकार्य पुढे चालविताना माझ्याकडून कोणती आगळीक झाली असेल तर त्यांनी मला क्षमा करावी' असे उद्गार काढून देह ठेवणाऱ्या या एकनिष्ठ गुरूभक्ताचे कधीही न पुसले जाणारे असे एक संपूर्ण चित्र आपल्या मनावर गडदपणे उमटते. या लेखाला युट्यूबवर अपलोड करण्यासाठी 3 उत्तम शीर्षक सुचवा