У нас вы можете посмотреть бесплатно संदेशाचा विषय : मजकडे या или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन. मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. मत्तय ११:२८-२९ *प्रिय मित्रांनो*, देवाच्या स्वभावाबद्दलची सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की तो आपल्यावर प्रेम करतो. तुम्ही देवापासून कितीही दूर असाल किंवा देवावर विश्वास ठेवत नसाल, तरीही तो तुमच्यावर प्रेम करतो. आणि त्याचे हे प्रेम आपल्या प्रत्येकाला दिलेल्या 'मजकडे या' या आमंत्रणामधून दिसून येते. जरी मनुष्य नेहमी देवापासून दूर पळतो, तरी देव नेहमी आपल्याला स्वतःकडे बोलावतो. जेव्हा आदामने एदेन बागेत पाप केले, तेव्हा तो देवापासून पळून लपला. आणि आजही मनुष्य त्या खऱ्या देवापासून पळत आहे आणि लपत आहे; आपण आपल्या खोटेपणाच्या मागे, आपल्या गर्वामागे, आपल्या पापांमागे, आपल्या स्वतःच्या धार्मिकतेमागे, देवाविषयीच्या आपल्या स्वतःच्या समजुतीमागे, या जगाच्या सुखांमागे आणि अशा अनेक गोष्टींमागे लपत आहोत. पण देव जो आपल्या आत्म्याची काळजी करतो, तो आपल्याला आपल्या आत्म्याला विसावा देण्यासाठी आणि आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी स्वतःकडे आमंत्रित करत आहे. तुम्ही म्हणाल की देव माझ्यावर प्रेम करत नाही आणि त्याने मला कधीही आमंत्रित केले नाही, पण मित्रांनो, जर तुम्ही हा संदेश वाचत असाल, तर तुम्हाला आमंत्रण मिळाले आहे. आणि आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही देवाकडे येण्याचे आमंत्रण स्वीकारता की देवाचे आमंत्रण नाकारता. तुमच्यासाठी असलेल्या देवाच्या आमंत्रणाबद्दल अधीक जाणून घेण्यासाठी कृपया संदेश ऐका.