У нас вы можете посмотреть бесплатно #भैरवगड или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
• #जंगलसफारी निसर्ग सहल#यवतेश्वर#बामनोली#कास... धनंजय अवसरे, 8999173932 हेमंत लंगडे 9146831015 Dashrath ranadive godgift tours and travels -9822314109 #भैरवगड ट्रेक आणि जंगल सफारी #bhairavgarh koyana Nagar parisar# Dhananjay avsari Hemant langad भैरवगड koyana Nagar parisar ट्रॅक अँड एक जंगल सफर भैरवगड ट्रेक आणि जंगल सफारी . आम्ही रानभैरी, रानामध्ये-वनामध्ये असणाऱ्या ज्ञात-अज्ञात, दृश्य-अदृश्य भैरवाच्या/शिवाच्या म्हणजेच थोडक्यात निसर्गदेवतेच्या दर्शनासाठी भटकणारे "रानभैरी" (निसर्गभक्त). मागच्या रविवारी म्हणजे 20 फेब्रुवारी 2022 ला भैरवगड ला गेलो होतो, भैरवगड (कोयनानगर परिसर) घाटमाथ्यावरील पहारेकऱ्यांपैकी भैरवगड हा एक चांदोली आणि कोयनेच्या जंगलांच्या सीमेवर वसलेला एक वनदुर्ग. अतिशय गर्द झाडी, त्यातले पशुपक्षी, कोकणचा नयनरम्य परिसर मन प्रफुल्लित करून सोडतो. घनदाट जंगलातील कच्च्या रस्त्यावरील प्रवासामध्ये देखील एक वेगळा रोमांचक अनुभव मिळतो. भैरवनाथ मंदिर तसेच बुरुजावरून घडणारे कोकणचे मनोहारी दर्शन सुखावून जाते. खिंडीपर्यंतचा 20-25 मिनिटांचाच सोपा ट्रेक असल्याने सहकुटुंब सहभागी होता येते हि आणखी एक जमेची बाजू होती, आणि आज ट्रेक पेक्षा निसर्ग भटकंती खूपच सुंदर होती, थोडक्यात जंगल सफारीच म्हणा ना, तर या सफारी साठी मस्त ग्रुप पण जमला, ठरल्या प्रमाणे रविवारी पहाटे निघालो, मी, हेमंत गजानन, आणि हो आमच्या सौभाग्यवती म्हणजे प्रज्ञा अवसरे पण होत्या, हल्ली महिला ट्रेकर्स ची पण लक्षणीय वाढ झाली आहे, आणि या कारणाने म्हणा किंवा पहिल्या पासून ट्रेकिंग ची आवड असल्याने वेळ मिळाला की सोबतीला येतेच. आणि आज तर तिच्या मैत्रिणी पण बरोबर होत्या. देवराई ला मस्त चहा नाश्ता घेऊन आम्ही गाड्या बदलल्या म्हणजे महिंद्रा च्या कमांडर जीपने पुढील प्रवास होता कारण काही अंतर गेल्यावर डांबरी रस्ता संपून कच्चा रस्ता होता, दोन्ही जीपने सारथी एकदम मस्त होते त्यामुळे जंगल सफारीचा मस्त आनंद लुटला, वाटेत रान कोंबडा, मुंगूस, तसेच महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेखरू तसेच अनेक विविध रंगी फुलपाखरे पाहायला मिळाली.तसेच जंगलातील गर्द झाडातील प्रवासही सर्वांना भावला, भैरवगड च्या बुरुजापर्यंत चा छोटेखानी ट्रेक करून परत आल्यावर भैरवनाथ मंदिर परिसरात असलेला एकमेव झरा आणि त्याचे थंडगार आणि सुमधुर पाणी पिऊन सर्वानी आपली तृष्णा भागवली आणि मजा मस्ती करत परत फिरलो, वाटेत मळे गावात शाळेजवळ जेवण केले आणि थंडगार ताक पिऊन सर्वजण तृप्त झाले, शाळेला तर सुट्टी होती पण अनाहूत पाहुण्यांना पाहायला शाळेतील बालचमू जमा झाला मग काय आमच्या बरोबरच्या पल्लवी, निकिता यांनी त्यांच्याशी संवाद साधला ,शाळा ,शिक्षक आणि अभ्यास याची चौकशी करून त्यांना बरोबर आणलेला खाऊ पण दिला. तो पर्यंत त्यांचे शिक्षक पण आले त्यांच्याशी गप्पा मारून झाल्यावर परतीचा प्रवास सुरू केला, खरंतर परत फिरावयास कोणीही तयार नव्हते कारण जंगलसफारी, शेखरू, पाण्याचा झरा, भैरवनाथाचे मंदिर, किल्ला ह्यातच सर्वजण रमले होते. धनंजय अवसरे, 8999173932 हेमंत लंगडे 9146831015 प्रज्ञा अवसरे सातारा. गडावर पहाण्यासारखी ठिकाणे भैरवगडाच्या समोरच्या डोंगरावरील मंदिरात भैरी देवी, तुळाई देवी, व वाघजाई देवी यांच्या २ ते ३ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात १०० जणांची झोपण्याची सोय होऊ शकते. मंदिरा समोरच्या प्रांगणात तुळशीवृंदावन व शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो. मंदिराच्या उजव्या बाजूला एका खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. भैरवगड किल्ल्याचा डोंगर भैरवगड किल्ला मंदिरासमोरील डोंगरावर आहे. तेथे जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूने खाली उतरणार्या पायवाटेने जावे लागते. किल्ल्याच्या डोंगरावर पोहचल्यावर एक बांधीव बुरूज आणि येथेच वरच्या बाजूला कातळात कोरलेली मोठी चौकोनी गुहा आहे. पूर्वीच्या काळी टेहळणीसाठी बसणारे टेहळे येथे बसून लांबवर नजर ठेऊ शकत असले पाहिजेत. या गुहेमुळे पाऊस वार्यापासून त्यांचे संरक्षण होत असावे. गुहेपासून थोडे पुढे जाऊन डोंगराला वळसा मारल्यावर दरीच्या बाजूला बुरूज असलेला ढासळलेल्या अवस्थेतील दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यावर समोरच्या टेकाडाच्या चढावावर दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. हा दरवाजाही ढासळलेला आहे. गडमाथा तसा अरुंदच आहे, त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. गडावरून लांबवर पसरलेले कोयनेचे दाट जंगल दिसते. पाण्याची सोय दक्षिणामुख दरवाजा असलेल्या टेकाडाला वळसा मारून गडाच्या मागील बाजूस गेल्यावर येथे पाण्याची दोन टाकी दिसतात. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही असते. मंदिराकडे येणार्या कच्च्या रस्त्याने चालत जाऊन डावीकडे दरीत उतरणार्या वाटेने ५ मिनिटे खाली उतरल्यावर पाण्याचे एक टाके दिसते. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते. मंदिराच्या मागच्या बाजूला कोकणातील पाते (गोवळ पाती) गावात उतरणारी वाट आहे. या वाटेने ५ मिनिटे खाली उतरल्यावर एक चौकोनी विहीर आहे. या विहिरीला बारमाही पाणी असते.