Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Karuna Tripadi Datta в хорошем качестве

Karuna Tripadi Datta 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Karuna Tripadi Datta

#karunaTripadi #Sadguru #Guru ॥ करुणात्रिपदी॥ करुणात्रिपदी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दत्तप्रभूंची चैतन्यमय, हृद्य, दत्तकृपांकित अश्या तीन पदांनी भाकलेली करुणा. अत्यंत प्रभावी आणि तेवढेच मन शांत करणारी ही दत्त आराधना. रोजच्या उपासनेत एकदा तरी म्हणावीच अशी दत्त प्रार्थना. गुरुदेव वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्याला देणगी म्हणून दिलेली ही त्रिपदी प्रत्येकाने रोज संध्याकाळी ऐकण्या-म्हणण्या साठी! ज्या ज्या वेळी मन उद्विग्न होते, ज्या ज्या वेळी काय करावे सुचत नाही, काही आधार नाही आता काय करू असे होते, तेव्हा दत्त प्रभुंना समरावे. करुणात्रिपदी डोळे मिटून ऐकावी आणि सगळी काळजी, चिंता दत्त प्रभूंच्या चरणी सोडून द्यावी. इथे करुणात्रिपदीतील पदांचा क्रम बदललेला आहे, त्याचे कारण म्हणजे एकदा गुरुदेव वासुदेवानंद सरस्वती मला म्हणाले, " बाळ, शांत हो श्रीगुरुदत्ता म्हणताना मनात शांत भाव निर्माण झाला पाहिजे. दत्तगुरूंची ही प्रार्थना अतिशय करुणाघन आहे आणि तीअशी म्हणावी की मन शांत झाले पाहिजे." मुख्य म्हणजे शांत हो श्रीगुरुदत्ता ऐकल्यानंतर दुसरे काही म्हणावेच लागू नये. आणि खरेच असेच होते. माझ्या गुरुमहाराजांनी, म्हणजे साक्षात वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलेली ही चाल. एकदा डोळे मिटून "शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता " एक, आणि तुम्हाला डोळे उघडावेसेच वाटणार नाहीत. मग बसा शांत दोन मिनिट, आणि दत्त कृपेची अनुभूती घ्या! हरि ॐ॥ राहुल फाटे. #Karunatripadi #Datta #VasudevanandSaraswati #ShripadVallabh #Dattatreya 1।।श्रीगुरुदत्ता ।। श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।धृ।। चोरे द्विजासी मारीता मन जे । कळवळले ते कळवळो आता ।। श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।१।। पोटशूळाने द्विज तडफडता । कळवळले ते कळवळो आता ।। श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।२।। द्विजसुत मरता वळले ते मन । हो की उदासीन न वळे आता।। श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।३।। सतिपति मरता काकुळती येता । वळले ते मन न वळे की आता।। श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।४।। श्रीगुरुदत्ता त्यजी निष्ठुरता। कोमल चित्ता वळवी आता।। श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।५।। 2. ।। जय करुणाघन।। जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन ।।धृ।। निज-अपराधे उफराटी दृष्टी । होऊनि पोटी भय धरू पावन ।। जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन ।।१।। तू करुणाकर कधी आम्हांवर । रुसशी न किंकर-वरद-कृपाघन।। जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन ।।२।। वारी अपराध तू मायबाप । तव मनी कोप लेश न वामन ।। जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन।।३।। बालकापराधा गणे जरी माता । तरी कोण त्राता देईल जीवन ।। जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन ।।४।। प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव । पदी देवो ठाव देव अत्रिनन्‍दन।। जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन।।५।। 3. ।। शांत हो श्रीगुरुदत्ता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता ।मम चित्ता शमवी आता ।।धृ।। तू केवळ माता जनिता । सर्वथा तू हितकर्ता || तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता || भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता || तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता || शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।१।। अपराधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ।। तरि आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ।। तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करूं धावा || सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता || शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।२।। तू नटसा होउनि कोपी । दंडिताहि आम्ही पापी || पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरी न च संतापी ।। गच्छतः स्खलनं क्वापि । असें मानुनि नच होऊ कोपी || निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ।। शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।३।। तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां || सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दूजा (दुसरा) त्राता || निजबिरुदा आणुनि चित्ता । तू पतितपावन दत्ता || वळे आतां आम्हांवरता | करुणाघन तू गुरुनाथा || शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।४।। सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हें घरदार || तव पदी अर्पू असार । संसाराहित हा भार || परिहरिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबन्‍धो || आम्हां अघ लेश न बाधो । वासुदे-प्रार्थित दत्ता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ।।५।।

Comments