У нас вы можете посмотреть бесплатно जेजुरी दर्शन | Jejuri Darshan 2024 | मार्तंडभैरव षडरात्रोत्सव | Shadratrotsav | Khandoba Darshan | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#jejuri #khandoba_status #khandoba #khanderaya #jejuri_khandoba #martand #kuldaivat #jejuridarshan #ghat #malhari #JEJURI2024 #sanatandharma #hindudeity #hindu #saint #lordshiva #banu #mhalsa #shiva #dakshinakashi #malhari_status #devotional #spiritual #marathi #pune #maharashtra #yelkotyelkotjaimalhar #changbhal #khandobatemple #jejuri #jejurichakhandoba #sonyachijejuri #जेजुरी #सोन्याची_जेजुरी #श्री_मार्तंड_देवसंस्थान_जेजुरी #Jejuri #Jejuri_Video #जेजुरीगड_इतिहास #खंडोबा #खंडोबाची_जेजुरी #Jejuri_Khandoba #Jejuri_Gad#Jejuri_Temple #Jejuri_Darshan जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार। मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ।। संत नरहरी सोनारांच्या या ओळी... पुरातन काळापासून भारताची दक्षिणकाशी मानल्या जाणा-या, जेजुरीचा खंडोबा म्हणजे प्रत्यक्ष महादेवाचा अवतारच... शंकराचा हा अवतार अत्यंत उग्र - सुर्यासारखा तेजस्वी असल्यान, मार्तंड भैरव नावाने प्रसिद्ध आहे. गडकोटावर जाण्यासाठी 385 पायऱ्या आहेत. या पायऱ्या बांधण्यासाठी 9 लाख दगड वापरण्यात आले होते. यामुळे याचा उल्लेख नवलाख पायरी म्हणून केला जातो. खंडेरायाची राजधानी असलेल्या जेजुरी गडाच्या प्रथम पाच पायर्या वराने वधुला कडेवर उचलुन घेत चढायची परंपरा इथ आजही मोठ्या श्रद्धेने जोपासली जाते. शिवशंकर आणि पार्वती मल्हारगडावर संसाररूपी नांदत असल्याने विवाह झाल्यानंतर प्रपंचाची सुरूवात करण्यापुर्वी वर आणि वधु जेजुरी गडावर येऊन कुलदेवतेचे दर्शन आणि आशिर्वाद घेतात. थोडंसं पुढे जाताच आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन होते, त्यांनी इथेच कुलदैवत श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेऊन इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली होती. वाटेत खंडोबांची द्वितीय पत्नी, बानाई, आणि हेगडी प्रधान यांचे मंदिर लागते. गडावर जाताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन होते, त्यांचा जेजुरी नगरीच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. इथूनच जेजुरी गावाचं विहंगम दृष्य बघायला मिळतं. पायऱ्या चढून वर गेल्यावर दिसत प्रचंड असं महाद्वार! इथं सिंहाच्या दोन कोरीव मुर्त्या आहेत. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाच आणि पितळी पत्र्यान मढवलेल मोठ कासव आहे. यावर भंडारा आणि खोबर उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभल… खंडोबांचा येळकोट… असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळी भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबर आणि भंडारा घ्यायचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यायची व मग खोबऱ्याची उधळण करायची. खंडोबाच्या यात्रा चैत्र, पौष आणि माघ या महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असे सहा दिवस, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या आणि आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात. खंडोबाच्या मूर्ती, उभ्या आणि अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र असून तो चतुर्भुज, कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला श्री खंडेरायाची घटस्थापना होते. सहा दिवसांपर्यंत चालणारा हा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या श्रद्धेन साजरा केला जातो. याला देवदिवाळी असही म्हणतात. श्री मल्हारी मार्तंड आणि मणी - मल्ल दैत्य यांच सहा दिवस युद्ध झाल म्हणूनच हा षडरात्रोत्सव साजरा केला जातो. सहाव्या दिवशी मल्हारी मार्तंडांनी मणी मल्ल दैत्यांचा संहार केला. मार्गशीर्ष शु. षष्ठी, शनिवारी, शततारका नक्षत्री, देव लिंग रूपाने प्रकट झाले तोच हा चंपाषष्ठीचा दिवस ! एका कथेनुसार दोन राक्षस भाऊ मणि आणि मल्ल यांनी भगवान ब्रह्माची तपस्या केली आणि त्यांच्या कडून वरदान मिळवल, त्यामुळे ते दोघे शक्तिशाली झाले आणि पृथ्वीवर लोकांना त्रास द्यायला लागले. मणि आणि मल्लाचा नाश करण्यासाठी भगवान खंडेरायान पृथ्वीवर अवतार घेतला. त्यांच्याशी भीषण युद्ध करून त्यांचा संहार केला. मल्ल राक्षसाला हरवले म्हणून खंडोबाचे नाव मल्हारी पडले. औरंगजेबानं जेजूरीगडावर देखील हल्ला केला होता. त्यानं, या किल्ल्याच्या तटबंदीला सुरुंग लावण्याची आज्ञा दिली. सुरुंग लावण्यासाठी तटबंदीला छिद्रे पाडण्यास सुरुवात झाली. पण जेंव्हा तटबंदीला छिद्रे पाडण्यात आली तेव्हा त्या छिद्रातून हजारो भुंगे बाहेर पडले आणि त्यांनी औरंगजेबाच्या सैन्यावर हल्ला केला. तेव्हा औरंगजेबाच सैन्य इकडे तिकडे पळून गेल. औरंगजेबास मल्हारी मार्तंड यांचा प्रताप कळून चुकला. औरंगजेबान कान पकडून खंडोबाची माफी मागितली आणि नवस केला की, “हे मल्हारी मार्तंडा, या भुंग्याच्या संकटातून सोडवा, मी तुम्हाला सव्वा लाख रुपायांचा सोन्याचा भुंगा अर्पण करीन.” आणि अशी शरणागती पत्करल्यानंतर भुंग्याचा उपद्रव थांबला अशी आख्यायिका आहे. पुढे औरंगजेबान आपला नवस पूर्ण केला आणि मल्हारी देवाला “मल्लूखान” असे नाव दिले. यामुळे आजही या भागातील मुस्लीम लोक मल्हारी ला “मल्लूखान” या नावानेच ओळखतात. आज हा भुंगा पाहायला मिळत नाही कारण पुढे सन 1850 मध्ये हा भुंगा चोरीला गेला अशी माहिती ब्रिटिश गॅझेटियर मध्ये मिळते. दसऱ्याच्या दिवशी इथे मोठी यात्रा भरते. अतिशय जड अशी पुरातन तलवार म्हणजेच खंडा उचलण्याचा एक अवघड खेळ इथ दरवर्षी खेळला जातो. ही तलवार उंच धरून जास्तीत जास्त वेळ उचलून धरणाऱ्या व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत आहे. खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा या शस्त्रावरून आले आहे. सोमवती अमावास्येलाही भाविक इथ दर्शनासाठी गर्दी करतात. तुम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या कुलदैवताला नक्की भेट द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडीओज साठी धर्मसेतूला नक्की सबस्क्राईब करा ! Credits - Audio and Video - Tushar Pargaonkar