У нас вы можете посмотреть бесплатно ३.६ लाख कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी | MRFA, राफेल, मिसाईल्ससह मोठा निर्णय | DD Sahyadri News или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
लढाऊ सज्जता वाढवण्यासाठी सुमारे ३ लाख ६० हजार कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेनं मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे भारतीय वायुदलासाठी मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट (MRFA), राफेल लढाऊ विमाने, कॉम्बॅट मिसाईल्स आणि एअर-शिप बेस्ड हाय अल्टिट्यूड स्यूडो सॅटेलाइट्स खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय लष्करासाठी ‘विभव’ रणगाडे-विरोधी सुरुंग, आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल्स, टी-७२ रणगाडे तसेच इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल्सच्या प्लॅटफॉर्म दुरुस्तीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, नौदल आणि तटरक्षक दलासाठी विविध आधुनिक उपकरणांची खरेदी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार असल्याचं मानलं जात आहे. संरक्षण क्षेत्रातील या मोठ्या घडामोडींसाठी व्हिडिओ पूर्ण पाहा. #DefenceNews #RajnathSingh #IndianAirForce #MRFA #Rafale #IndianArmy #IndianNavy #CoastGuard #DefenceAcquisition #IndiaSecurity