У нас вы можете посмотреть бесплатно अमेरिकन नेव्हीच्या दोन सबमरीन्स रशियाच्या सीमेजवळ तैनात, US vs Russia संघर्ष आणखी वाढणार ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #DonaldTrump #DmitryMedvedev जगातील दोन सर्वात मोठ्या आण्विक शक्तींमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. १ ऑगस्ट २०२५ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की, अमेरिकेने आपल्या दोन अत्याधुनिक ओहायो-श्रेणीच्या आण्विक पाणबुड्या सबमरीन रशियाच्या सीमेजवळ तैनात केल्या आहेत. हा निर्णय अचानक घेतलेला नसून, रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्याचे सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्या आक्रमक विधानाला प्रत्युत्तर आहे. मेदवेदेव यांनी एका मुलाखतीत रशियाच्या ‘डेड हॅन्ड’ प्रणालीचा उल्लेख केला होता, ज्याला ट्रम्प यांनी ‘मूर्खपणाचे’ आणि ‘चिथावणीखोर’ असे संबोधले. सामान्यतः अशा लष्करी हालचाली गुप्त ठेवल्या जातात, परंतु ट्रम्प यांनी ही माहिती जाहीर करून जगाला स्पष्ट संदेश दिला आहे की, अमेरिका कोणत्याही आण्विक धमकीला दुर्लक्षित करणार नाही आणि अमेरिका पूर्णपणे सज्ज आहे. यासोबतच, ट्रम्प यांनी रशियाला युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे, अन्यथा कठोर आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. या दोन महाशक्तींमधील संघर्षाचा जागतिक ऊर्जा बाजार, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भू-राजकीय समतोल यांच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.सध्याची परिस्थिती शीतयुद्ध काळातील ‘ब्रिंकमनशिप’ ची आठवण करून देते, जिथे अनुयुद्धाची शक्यता नेहमीच कायम होती. फरक एवढाच आहे की, तेव्हा जग द्विध्रुवीय होते, तर आता ते बहुध्रुवीय आहे.हा संपूर्ण विषय काय आहे हे जाणून घेऊया आणि युद्ध होण्याची शक्यता आहे का? तसेच, डेड हॅन्ड संकल्पना काय आहे हे सर्व समजून घेऊया. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/