У нас вы можете посмотреть бесплатно Dasbodh chalu samas nirupan dashak 17 samas 6 दासबोध निरूपण चालू समास निरूपण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
समास सहावा : देहात्मनिरूपण ॥ श्रीराम ॥ आत्मा देहाअध्यें असतो । नाना सुखदुखें भोगितो । सेवटीं शरीर सांडून जातो । येकायेकीं ॥ १ ॥ शरीरीं शक्ति तारुण्यपणीं । नाना सुखें भोगी प्राणी । अशक्त होतां वृद्धपणीं । दुःखें भोगी ॥ २ ॥ मरावेना ऐसी आवडी । हातपाये खोडून प्राण सोडी । नाना दुःखें अवघडी । वृद्धपणीं ॥ ३ ॥ देहआत्मयांची संगती । कांहींयेक सुख भोगिती । चर्फडचर्फडून जाती । देहांतकाळीं ॥ ४ ॥ ऐसा आत्मा दुःखदायेक । येकांचे प्राण घेती येक । आणी सेवटीं निरार्थक । कांहींच नाहीं ॥ ५ ॥ ऐसा दों दिसांचा भ्रम । त्यास म्हणती परब्रह्म । नाना दुःखाचा संभ्रम । मानून घेतला ॥। ६ ॥ दुःखी होऊन चर्फडून गेले । तेथें कोण समाधान जालें । कांहींयेकसुख भोगिलें । तों सवेंचि दुःख ॥ ७ ॥ जन्म दारभ्य आठवावें । म्हणिजे अवघें पडेल ठावें । नाना दुःख मोजावें । काये म्हणोनी ॥ ८ ॥ ऐसी आत्मयाची संगती । नाना दुःखें प्राप्त होती । दैन्यवाणे होऊन जाती । प्राणीमात्र ॥ ९ ॥ कांहीं आनंद कांहीं खेद । जन्मवरी पडिला समंध । नाना प्रकरीं विरुद्ध । तडातोडी ॥ १० ॥ निद्राकाळीं ढेकुण पिसा । नाना प्रकारीं वळसा । नाना उपायें वळसा । त्यांस होये ॥ ११ ॥ भोजनकाळी माश्या येती । नाना पदार्थ उंदीर नेती । पुढें त्यांची हि फजिती । मार्जरें करिती ॥१२ ॥ वा चामवा गोंचिड । गांधेलें कानटें उदंड । येकास येक चर्फड । दोहिकडे ॥ १३ ॥ विंचु सर्प वाग रिसें । सुसरी लांडिगे माणसास माणसें । परस्परें सुखसंतोषें । येकहि नाहीं ॥ १४ ॥ चौर्यासि लक्ष उत्पत्ती । येकास येक भक्षिती । नाना पीडा दुःखणी किती । म्हणौन सांगावें ॥ १५ ॥ ऐसी अंतरात्म्याची करणी । नाना जीव दाटले धरणीं । परस्परें संव्हारणी । येकयेकांची ॥ १६ ॥ अखंड रडती । चर्फडिती । विवळविवळों प्राण देती । मूर्ख प्राणी त्यास म्हणती । परब्रह्म ॥ १७ ॥ परब्रह्म जाणार नाहीं । कोणास दुःख देणार नाहीं । स्तुती निंदा दोनी नाहीं । परब्रह्मीं ॥ १८ ॥ उदंड शिव्या दिधल्या । तितुक्या अंतरात्म्यास लागल्या । विचार पाहतां प्रत्यया आल्या । येथातथ्य ॥ १९ ॥ धगडीचा बटकीचा लवंडीचा । गधडीचा कुतरीचा वोंगळीचा । ऐसा हिशेब सिव्यांचा । किती म्हणोनि सांगावा ॥ २० ॥ इतुकें परब्रह्मीं लागेना । तेथें कल्पनाचि चालेना । तडातोडीचें ज्ञान मानेना । कोणीयेकासी ॥ २१ ॥ सृष्टीमधें सकळ जीव । सकळांस कैचें वैभव । याकारणें ठायाठाव । निर्मिला देवें ॥ २२ ॥ उदंड लोक बाजारीचे । जें जें आलें तें तें वेंचे । उत्तम तितुके भाग्याचें । लोक घेती ॥ २३ ॥ येणें न्यायें अन्न वसन । येणेंचि न्यायें देवतार्चन । येणेंचि न्यायें ब्रह्मज्ञान । प्राप्तव्यासारिखें ॥ २४ ॥ अवघेच लोक सुखी असती । संसार गोड करून नेती । माहाराजे वैभव भोगती । तें करंट्यास कैचें ॥ २५ ॥ परंतु अंतीं नाना दुःखें । तेथें होतें सगट सारिखें । पूर्वीं भोगिलीं नाना सुखें । अंतीं दुःख सोसवेना ॥ २६ ॥ कठिण दुःख सोसवेना । प्राण शरीर सोडिना । मृत्यदुःख सगट जना । कासाविस करी ॥ २७ ॥ नाना अवेवहीन जालें । तैसेंचि पाहिजे वर्तलें । प्राणीं अंतकाळीं गेलें । कासाविस हौनी ॥ २८ ॥ रूप लावण्य अवघें जातें । शरीरसामर्थ्य अवघें राहातें । कोणी नस्तां मरतें । आपदआपदों ॥ २९ ॥ अंतकाळ दैन्य दीन । सकळिकांस तत्समान । ऐसें चंचळ अवलक्षण । दुःखकारी ॥ ३० ॥ भोगून अभोक्ता म्हणती । हे तों अवघीच फजिती । लोक उगेच बोलती । पाहिल्याविण ॥ ३१ ॥ अंतकाळ आहे कठिण । शेरीर सोडिना प्राण । बराड्यासारिखें लक्षण । अंतकाळीं ॥ ३२ ॥ इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे देहात्मनिरूपणनाम समास सहावा ॥ #dasbodh #दासबोधनिरूपण #दासबोध #chalusamasnirupan #manacheshlok #gurucharitra #dasbodhnirupan #manacheshlokwithlyrics #manacheshloknirupan