У нас вы можете посмотреть бесплатно गुरुप्रेमास्तव राहू आता| पंत महाराज बाळेकुंद्री भजन | दत्त प्रेमलहरी पद ४१९|datta premlahari pad 419 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गुरुप्रेमास्तव राहू आता ।। ध्यानीं धरूं गुरुबालावधूता ।। धृ० ।। नरजन्माचें काज सरलें ।। प्रेमास्तव शरीर उरलें ।। जाईल उद्यां कीं हो आतां ।। १ ।। खेळ खेळुनी बहुत भागलों ।। सर्वं असुनी सर्वां मुकलों ॥ लागली मूळ घरची चिंता ॥ २ ॥ सत्यज्ञानानंदसागरीं । सहज खेळे प्रेमलहरी ॥ विसरूं नको या दास दत्ता ।। ३ ।। ***************************** आता तर आम्ही केवळ गुरुप्रेम भोगण्यासाठी राहू आणि सद्गुरू बालमुकुंदाचे ध्यान करू ।।धृ. ।। कारण माझे या मनुष्य जन्माचे कार्य संपून गेले आहे. केवळ प्रेम भोगण्यासाठीच हे शरीर राहिले आहे. हे शरीर आता की उद्या निघून जाईल, हे सांगवत नाही ।। १ ।। गुरुभक्तांबरोबर खेळ खेळून मी फारच दमून गेलो आहे. मी स्वरूपेकरून सर्व असून, सर्वांना मुकलो आहे. मी अलिप्तच रहातो. मला आता माझ्या मूळघरची म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जाण्याची चिंता लागून राहिली आहे. माझ्या मनाची वृत्ति अंतर्मुख होत चालली. मी सदा आत्मरतच असतो ।। २ ।। सत्य ज्ञानानंद स्वरूप सागरांवर सहजपणे माझ्या प्रेमाच्या लहरी खेळतात. (सद्गुरू सागर मी त्या सागराची एक लाट आहे) प्रेम उचंबळून येते. अरे, या दास पंताला विसरू नकोस. माझा बोध, आज्ञा, लक्षांत आण. माझी आठवण ठेव ॥३ ॥ ***************************** #दत्तभजन #पंतमहाराजभजन #pantmaharajbhajan #पंतभजन #दत्तप्रेमलहरी #dattapremlahari #भजन #bhajan #आरती #arti #arati #भक्ति #bhakti #दत्तात्रेय #dattatraya #dattatreya #दत्त #datta #datt #भक्ती #pantsampraday #पंतसंप्रदाय #पंतसांप्रदाय #पंथमहाराज #panthmaharaj #अवधूत #अवधुत #avadhut #avdhoot #पंतमहाराजबाळेकुंद्री