У нас вы можете посмотреть бесплатно आळूच्या पानांची खमंग भाजी | आळूचे फदफदे | पारंपरिक चव आणि पौष्टिक रेसिपी | पुष्पाज खमंग किचन | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आळूची पानांची खमंग भाजी | अळूचे फदफदे | पारंपरिक चव आणि पौष्टिक रेसिपी पुष्पाज खमंग किचनमध्ये आपलं स्वागत! आज आम्ही घेऊन आलो आहोत आळूची पानांची खमंग भाजी म्हणजेच अळूचे फदफदे — पारंपरिक चव, पौष्टिकता आणि घरगुती स्टाईलमध्ये बनणारी खास रेसिपी. आळूची पानं व्हिटॅमिन, आयर्न, फायबरने भरलेली असल्यामुळे शरीराला ताकद, पचनाला हलकेपणा आणि त्वचेला पोषण देते. आजच्या रेसिपीत चिंच, हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, लसूण आणि बेसन यांचा एकदम मस्त संगम होऊन ही भाजी अजूनच चविष्ट होते. घरच्या घरी झटपट आणि एकदम खमंग अळूची भाजी बनवून पाहा — नक्की आवडेल! --- ⭐ साहित्य (Ingredients) आळूची पाने (देठासह) – आवश्यकतेनुसार फोडणीसाठी तेल – 2 टेबलस्पून मीठ – चवीपुरते लसूण – 8–9 पाकळ्या चिंच – अर्धा इंच (भिजवून) जिरे – अर्धा टीस्पून बेसन – 2 टेबलस्पून गूळ – चवीपुरता शेंगदाणे – भिजवून पोटभर हळद – 1 टीस्पून हरभऱ्याची डाळ – भिजवून अर्धी वाटी हिरव्या मिरच्या – 4 पाणी – गरजेनुसार हिंग – चिमूटभर --- ⭐ कृती (Method) 1. आळूची पाने आणि देठ स्वच्छ धुवून घ्या. देठांची साल काढून बारीक चिरून घ्या. 2. अर्धा तास चिंचेच्या पाण्यात पाने भिजत ठेवा. त्यामुळे घशाला खवखव होत नाही. 3. भिजवलेली हरभऱ्याची डाळ, भिजवलेले शेंगदाणे, चिंच, चिरलेली आळूची पाने आणि देठ — हे सगळे एकत्र कुकरमध्ये घ्या. 4. तीन शिट्ट्या होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. 5. कुकर थंड झाल्यावर भाजी आणि डाळ एकत्र छान मिक्स करून घ्या. 6. एका पॅनमध्ये तेल गरम करून जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या घालून सुगंधी फोडणी करा. त्यात हिंग आणि हळद घाला. 7. आता शिजवलेली आळूची भाजी फोडणीत घाला. 8. बेसन पाण्यात मिक्स करून भाजीमध्ये घालून हलवून घ्या. 9. गूळ चवीपुरता घाला आणि भाजी 5 मिनिटे उकळू द्या. 10. एकदम खमंग, चवदार आणि पारंपरिक अळूची भाजी तयार! हॅशटॅग #आळूचीभाजी #फदफदे #अळूच्यापानांचीभाजी #मराठीरेसिपी #पुष्पाजखमंगकिचन #घरीतयारभाजी #चुलीवरीलचव #मराठाKitchen #कोकणचाचव #अळूचीपानं #घरगुतीभाजी #सोपीरेसिपी #पारंपरिकभोजन #घरीस्वयंपाक #खमंगफदफदे -- #AlooLeavesRecipe #ColocasiaRecipe #AlooFadfada #IndianVegRecipe #TraditionalRecipe #HomemadeFood #EasyIndianCooking #HealthyIndianFood #VegetarianRecipe #MaharashtrianCuisine #IndianKitchen #CookingAtHome #FoodLovers #VegCurryRecipe #YouTubeCookingChannel पुष्पास खमंग किचनचे पॉप्युलर पारंपारिक व्हिडिओ रेसिपी पाहण्यासाठी युट्युब ची व्हिडिओ रेसिपी लिंक खाली दिलेली आ हे ती क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता / @pushpapol4946 music used: Dancing on sunshine musician VN video editor