У нас вы можете посмотреть бесплатно "पक्षी उन्हाचा" | या पुस्तकावर चर्चा | साधना प्रकाशनाचे नवे पुस्तक | Weekly Sadhana | राजन हर्षे | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#weeklysadhana #sadhanaprakashan #kartavyasadhana नॅशनल बुक ट्रस्ट ( एन. बी. टी.) ने आयोजित केलेल्या पुणे बुक फेस्टिवल मध्ये काल साधना प्रकाशनाच्या, राजन हर्षे लिखित "पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात " या पुस्तकावर चर्चेचा कार्यक्रम होणार होता. मात्र ऐनवेळी तो कार्यक्रम रद्द करावा लागत असल्याचे एन.बी. टी. ने कळवले होते. म्हणून त्या निर्णयाचा निषेध करून, तेच वक्ते व त्याच पुस्तकावरील चर्चा असा कार्यक्रम, पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात 22 डिसेंबर ला झाला. प्रारंभी संपादक विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक करताना, एन. बी. टी. बरोबर कार्यक्रम ठरवणे ते रद्द होणे, हा घटनाक्रम आवश्यक त्या सर्व तपशिलांसह सांगितला. त्यानंतर संकल्प गुर्जर यांनी लेखक डॉ. राजन हर्षे व डॉ . पंडित विद्यासागर यांच्याशी संवाद साधला. तिसरे वक्ते डॉ सतीश बागल हे viral infection ने आजारी असल्याने नाशिकहून येऊ शकले नाहीत, मात्र त्यांनी या पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवणारे 12 मिनिटांचे भाषण व्हिडिओ स्वरूपात पाठवले होते. तो व्हिडिओ या कार्यक्रमात दाखवण्यात आला. दीड तासाच्या मुलाखतीत अभ्यास, संशोधन, प्रशासन व शैक्षणिक धोरण या चार मुद्द्यांच्या अनुषंगाने उत्तम चर्चा झाली..या संपूर्ण कार्यक्रमाचा हा व्हिडिओ. शिवाय, साधनाच्या 30 डिसेंबरच्या साधना अंकात या घटनेच्या निमित्ताने वस्तुस्थिती सांगणारे संपादकीय प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर येणाऱ्या 6 जानेवारी अंकात ही संपूर्ण मुलाखत शब्दांकन करून प्रसिद्ध होणार आहे. Thanks संपादक, साधना साप्ताहिक --------------------------------------------------------------------------------- व्हिडिओ निर्मिती : संयोजन : सुदाम सानप. रेकॉर्डिंग व एडिटिंग : साईनाथ (सांगवे) जाधव. संपर्क : साप्ताहिक साधना 431, शनिवार पेठ, पुणे 411030 kartavyasadhana@gmail.com Mob. 7058286750 --------------------------------------------------------------------------------- Follow / Subscribe us on: » Visit Website - Weekly Sadhana : https://weeklysadhana.in/ » Like us on Facebook : / weeklysadhana » Tweet us on Twitter : / kartavyasadhana » Follow us on Instagram : / weeklysadhana » Subscribe to our YouTube Channel : / @weeklysadhana8298