У нас вы можете посмотреть бесплатно संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील योगशास्त्र व विज्ञान I डॉ अंजलीताई दंडवते I दिनांक ५ मार्च, २०२६ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील 🚩*योगशास्त्र व विज्ञान*🚩 "*तीर्था: कुर्वन्ति तीर्थाणी*" असे नारदांनी भक्तीसूत्रात म्हटले आहे त्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांचे जीवन आहे. इंद्रायणीच्या काठी देहू गावात मोरे किंवा आंबले या नावाचे घराणे आहे. या कुळामध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झाला. मोरे परिवार अत्यंत श्रीमंत,समृद्ध आहे. देहू गावातील ते सावकार आहेत. परंतु या घराण्याची खरी संपत्ती म्हणजे विठ्ठल भक्ती. त्यांच्या अनेक पिढ्यांपासून पंढरपूरची वारी आहे. तुकाराम महाराज यांचे वडिल बोल्होबुवा आणि आई कनकाबाई आहेत. तुकाराम महाराजांना लहानपणापासूनच भगवंताचा लळा होता. ते विठ्ठलभक्तीत रंगून गेले होते. तुकाराम महाराज अत्यंत हुशार, व्यवहारदक्ष होते परंतु दुष्काळात त्यांना फार मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. दुष्काळामुळे शेती नाही, उत्पन्न नाही,धान्य नाही शेतक-यांना खायला अन्न नाही अशावेळी शेतकरी लोक कर्ज कसे परत करणार? हे पैसे आपले बुडाले हे गृहित धरुन तुकाराम महाराजांनी शेतक-यांचे कर्ज माफ केले. खातेवह्या इंद्रायणीत फेकून दिल्या. पण ज्या लोकांकडून माल आणला होता त्यांचे पैसे मात्र परत दिले ही तुकाराम महाराजांची प्रामाणिक निष्ठा दिसते. अशाप्रकारे दैवी आपत्तीमुळे व्यवसाय बुडाला. या प्रसंगानंतर तुकाराम महाराजांचे भाग्य म्हणजे भगवंताविषयी प्रीति निर्माण झाली. तुकाराम महाराजांचा संस्कृतचा अभ्यास होता म्हणून ते म्हणतात. 'वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाचि साधिला। विठोबासी शरण जावे। निज निष्ठे नाम घ्यावे । वाचे बोलू वेदनिती। करू संती केले ते, आम्ही बैकुंठवासी । आलो याच कारणसी, । बोलिले जे ऋषी । साचभावे वर्ताया। अथें लोपले पुराणे । नाश केला शब्दज्ञाने । झाडू संतांचे मार्ग । आडमार्गी भरले जग।' संतांनी सांगितलेलं सोडून वेगवेगळ्या मार्गाने लोक चाललेले आहेत., संतांचा मार्ग पुन्हा स्वच्छ करण्यासाठी मी जन्माला आलेलो आहे. 'फोडीले भांडार । धन्याचा हा माल । मी तव हमाल। भारवाही ।' ही तुकाराममहाराजांची धारणा आहे. १६५० साली फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. तुकाराम महाराजांनी जे काही प्राप्त केले ते भगवद्भावाच्या बळावर. विलक्षण शरणागती,विलक्षण व्याकूळता भगवंताशिवाय आपले कोणीच नाही या भांडवलावर त्यांनी विठ्ठल आपला करुन घेतला. "आपुले मरण पाहिले म्या डोळा" तसेच "अणुरणीया थोकडा/ तुका आकाशा एवढा " या दोन अभंगातील योगशास्त्र व विज्ञान काय आहे हे संत तुकारामांचे मृत्यू अनुभव या दृष्टीने आज चिंतन करणार आहोत. आदरणीय डॉ अंजलीताई दंडवते यांच्यासोबत, दिनांक ५ मार्च, २०२६ रोजी सकाळी ९ ते १० वाजता संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील योगशास्त्र व विज्ञान अनुभव याचे चिंतन करणार आहोत तरी सर्व श्रोत्यांनी अवश्य लाभ घ्यावा. ✨ जेथे शास्त्र जागृत होते, साधक प्रबुध्द होतो – तेच सिद्ध साधक साधना! ✨ *भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास करण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आमच्या बरोबर सामील व्हा*. १. YouTube चॅनल: आमच्या चॅनलवर तुम्हाला शास्त्र, ग्रंथ आणि चिंतनावर आधारित व्हिडिओ मिळतील. चॅनलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 🔗 Youtube channel Link : / सिध्दसाधकसाधना २. WhatsApp चॅनल: नवीन व्हिडिओ, कार्यक्रमाची माहिती आणि दैनंदिन सुविचार त्वरित मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp चॅनलला जॉईन करा. 🔗 Follow the सिध्द साधक साधना channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaA8... ३. Follow the सिध्द साधक साधना channel on Arattai ; Arattai वर संवाद साधा, साधकांच्या परिवाराचा भाग व्हा. https://aratt.ai/@siddha_sadhak_sadhana 🌹*सिध्द साधक साधना* 🌹 – तुमच्या अंतर्मनाचा आध्यात्मिक साथी. #santtukaram #सिध्दसाधकसाधना #siddhasadhaksadhana