У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर असंही सेलिब्रेशन | त्या २९ महिलांना कडक सॅल्यूट 🫡🫡 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
त्या २९ महिला कळसुबाई शिखरावर महिला दिनी का गेल्या? बायकांना कमी लेखू नका, रुसल्या तर एवढ्या उंचावर येऊन बसतात... ही मिश्किल प्रतिक्रिया आहे ७१ वर्षांच्या अंजनी घाटे यांची. आणइ ही प्रतिक्रिया आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर चढून गेल्यानंतरची. त्याचं झालं असं... जागतिक महिला दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करावा, असे "भवताल" टीमने ठरवले. आधुनिक काळात महिला सक्षम होत आहेत, तर महिला दिन साजरा करण्याची पद्धतही तशीच हवी. म्हणूनच त्या दिवशी महिलांना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर न्यावे. तसेच, भंडारदरा परिसरातील सांधन व्हॅली, कोकण कडा, प्राचीन अमृतेश्वर मंदिर, जलविद्युत निर्मिती करणारा वैशिष्ट्यपूर्ण घाटघर प्रकल्प, त्या भागातील निसर्ग यांचे दर्शन घडवावे, अशी कल्पना पुढे आली. ही कल्पना जाहीर करताच महिलांचा राज्यभरातून प्रतिसाद आला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नांदेड, इंदूर, हैदराबाद अशा वेगवेगळ्या भागातून महिला सहभागी झाल्या. त्यापैकी २९ जणींनी जागतिक महिला दिनी म्हणजेच, ८ मार्च रोजी कळसुबाई शिखर सर केले. १३ ते ७१ वर्षे असा त्यांचा वयोगट होता. बऱ्याच महिलांचा हा पहिलाच ट्रेक होता. आपापल्या शीरीरिक व मानसिक क्षमता आजमावत त्यांनी हे आव्हान पूर्ण केले. शिखरावर पोहोचल्यावर त्यांच्या भावना काय होत्या, त्यांनी हे आव्हान कसे पार केले हे सारे या महिलांकडून ऐकवणारा हा व्हिडिओ. ...... The story of 29 ladies who climbed Maharashtra's highest Kalsubai peak on Women's Day The celebration of World Women's Day 2025 happened in Bhavatal style. It planned a Nature camp in beautiful Bhandardara area. It's main attraction was- trek to Maharashtra's highest Kalsubai peak. This nature camp also had inclusion of visit to the famous Sandhan valley, Konkan Kada, Pumped electricity project at Ghatghar, 800 years old architecture marvel Amruteshwar temple, the nature of that area and many more things. On Women's Day, 29 ladies climbed Kalsubai peak and proved their capabilities and strength. The range was from 13 years young student to 71 years old grand lady. Once they reached peak, they expressed their feelings. The video is about the same.