У нас вы можете посмотреть бесплатно #SaniFulmali или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पुण्यातील लोहगाव येथे झोपडीत राहणाऱ्या सनी फुलमाळी याने नुकत्याच पार पडलेल्या आशियाई युवा कुस्ती क्रिडा स्पर्धेत साठ किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले असून त्याच्या या कामगिरीने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. सनीचे वडील सुभाष फुलमाळी हे मुळचे बीडचे राहणारे. 15 वर्षापूर्वी कुटुंबाला सोबत घेऊन ते पुण्यात आले. पुण्यातील लोहगाव येथे एका मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची झोपडी टाकली. बायको तीन मूले असा त्यांचा परिवार या झोपडीत राहत होता. सुभाष हे नंदी बैल घेऊन लोकांच्या दारोदारी जाऊ लागले तर बायको सुई दोरा विकू लागली. दोघेही पती पत्नी कष्ट करुन उदरनिर्वाह करू लागले. सनीचे वडील सुभाष यांना कुस्तीची खूप आवड असून वडील पैलवान असल्याने सुभाष यांनी देखील अनेक ठिकाणी कुस्ती केली. पण एखाद्याने उपकाराने आपल्या एक झोपडी रहायला दिलेली असताना आणि परिस्थिती हलकीची असताना तिन्ही मुलांना सुभाष हे त्याच पडीक जागेत कुस्तीचे धडे देऊ लागले. सनी हा तीन नंबरचा मुलगा असून लहानपणापासून तो दोन्ही भावांसोबत कुस्ती खेळू लागला. कुस्ती खेळात तरबेज असलेल्या सनीची कला ओळखून लोहगाव मधील रायबा तालीम मधील पैलवान सोमनाथ मोझे आणि पैलवान सदा राखपसरे यांनी सनीला कुस्तीचे धडे देण्यास सुरवात केली. आणि त्याला नंतर लोणीकंद येथील पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांच्या जाणता राजा तालमीत पाठवले. सनीची कुस्ती पाहून संदीप भोंडवे यांनी त्याला दत्तक घेतलं आणि त्याला कुस्तीचे धडे दिले आणि बहेरेन येथे झालेल्या एशियन युथ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. घरची परिस्थिती बिकट असूनही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर बहरिन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक कमावणाऱ्या सनी फुलमाळीचं आयुष्यच पालटलं आहे. लोहगाव मधील पालावर राहून कुस्तीमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळीचे पालकत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आहे. लोकसहभागातून घर आणि सरावासाठी तालीम, शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत आणि स्वतःच्या पगारातून दरमहा ५० हजार देण्याची घोषणा पाटील यांनी केली. तर लोहगावसह पुण्यातील अनेक राजकीय सामाजिक मान्यवरांनी सनीच्या या यशासाठी कौतूकासह आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. #SaniFulmali #WrestlingChampion #asianyouthgames #asianyouthgames2025 #news #latestnews #breakingnews #marathi #kustiwrestling मल्हारवृत्त Please like and subscribe to our YouTube channel - / @malharvrutta Facebook - / 1hqbaktjbs Instagram - https://www.instagram.com/malhar_vrut... Click to join our WhatsApp group -https://chat.whatsapp.com/KRxHGDfME7T... आमच्या व्हाॅट्सऍप ग्रुप, फेसबुक, युट्युब, इंन्टाग्राम चॅनलला जॉईन, लाईक, सबस्क्राईब करा 🙏 मल्हार वृत्तचे सर्व अपडेट्स यापुढे आपणांस याच ग्रुपमध्ये आपणांस पहावयास मिळतील 🙏